मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट ट्रेन दररोज धावणार, रेल्वे मंत्र्यांचं ट्विट

मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन आठवड्यात चार दिवस चालवली जाणार आहे. Mumbai Hazrat Nijamuddin Rajdhani

मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट ट्रेन दररोज धावणार, रेल्वे मंत्र्यांचं ट्विट

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने आता मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन आठवड्यात चार दिवस चालवली जाणार आहे. मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.  (Mumbai Hazrat Nijamuddin Rajdhani Superfast Special train ran four day within week )

मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन मुंबईहून सांयकाळी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 9 वाजून 55 मिनिंटानी पोहोचेल. या ट्रेनचा क्रमांक 01221 आणि 012222 हा असेल. 19 जानेवारीपासून मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सेवा सुरु होणार आहे. ट्रेन नंबर 01222 ही हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 20 जानेवारीला हजरत निजामुद्दीन येथून सुटणार आहे. हजरत निजामुद्दीन येथून ही ट्रेन सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजून 15 मिनिंटानी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

प्रवाशांना मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेनसाठी 14 जानेवारीपासून बुकिंग करता येणार आहे. तसेच या ट्रेनच्या थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या ट्रेनच्या तिकीटाचं बुकिंग रेल्वे स्टेशन आणि आयआरसीटीसी वेबसाईट आणि अ‌ॅपद्वारे करता येणार आहे. ज्या प्रवाशांचं तिकीट कन्फर्म झालेले असेल त्यांनाच या गाडीतून प्रवास करता येईल.

मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सेवा सुरु झाल्यामुळे मुंबई दिल्ली प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेऊन 21 मार्च आणि 31 जुलैमध्ये 2020 पर्यंतचं तिकीट रद्द करण्याचा कालावधी 9 महिन्यांपर्यंत वाढवला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्व रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या.

पियुष गोयल यांचं ट्विट

संबंधित बातम्या:

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

Indian Railway | एक किमी अंतरासाठी ट्रेनला लागते ‘इतके’ डीझेल! वाचा ट्रेनच्या मायलेजविषयी…

(Mumbai Hazrat Nijamuddin Rajdhani Superfast Special train ran four day within week )

Published On - 4:29 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI