आणीबाणीपेक्षाही भयावह स्थिती, विरोधक एकत्र आल्यास सहा महिन्यात परिणाम दिसतील: ममता बॅनर्जी

दिल्लीत येऊन राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर वार करण्यास सुरुवात केली आहे. (My phone is hacked, situation more serious than Emergency: Mamata Banerjee )

आणीबाणीपेक्षाही भयावह स्थिती, विरोधक एकत्र आल्यास सहा महिन्यात परिणाम दिसतील: ममता बॅनर्जी
Mamata Banerjee

नवी दिल्ली: दिल्लीत येऊन राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर वार करण्यास सुरुवात केली आहे. संसदेतही काम होत नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, अशी घणाघाती टीका करतानाच सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच चांगले परिणाम दिसतील, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. (My phone is hacked, situation more serious than Emergency: Mamata Banerjee )

ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. माझा फोनही हॅक करण्यात आला होता. अभिषेक आणि राजनीतीकार प्रशांत किशोर यांचा फोनही हॅक करण्यात आला होता. फ्रिडम ऑफ प्रेसही उरलेलं नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. पेगासस हा एक खतरनाक व्हायरस आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. संसदेचं काम सुरू नाही. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. सध्या तरी आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, असं त्या म्हणाल्या.

अधिवेशनानंतर सर्वांशी बोलणार

विरोधी पक्षांनी एकत्र यावं का? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ही संपूर्ण सिस्टिमच राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. कोणी त्याचं नेतृत्व करत असेल तर मला काहीच अडचण नाही. माझं मत कुणावर मला थोपवायचं नाही. अजून अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. संसदेच्या अधिवेशनानंतर सर्व राजकीय पक्षांशी मी स्वत: बोलणार आहे.

सोनिया, केजरीवाल यांना भेटणार

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मी भेट घेणार आहे. तसेच लालूप्रसाद यावद यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. सर्व लोक एकत्र यायला तयार आहेत. विरोधकांनी एकत्र यावं असं सोनिया गांधी यांनाही वाटतं. त्यांच्याशी भेट घेऊन यावर चर्चा करणार आहे. विरोधकांनी एकत्र येण्यावर गंभीरपणे विचार केला तर सहा महिन्यातच त्याचे परिणाम दिसतील, असंही त्या म्हणाल्या.

आता ‘खेला होबे’

माझे सर्वच विरोधी पक्षनेत्यांशी चांगले संबंध आहेत. जर राजकीय वादळ उठलं तर त्याला कोणीच रोखू शकणार नाही. आता ‘खेला होबे’ची ललकार संपूर्ण देशात ऐकायला मिळेल. बरेच दिवस अच्छे दिनची वाट पाहिली. आता सच्चा दिन दाखवण्याची गरज आहे. ते आम्हीच पूर्ण करू, असं त्या म्हणाल्या. (My phone is hacked, situation more serious than Emergency: Mamata Banerjee )

 

संबंधित बातम्या:

Parliament Monsoon Session: पेगाससवरून संसदेत तांडव, लोकसभा अध्यक्षांवर कागद फेकले; 10 खासदार निलंबित होणार?

मोदी-शहांकडून देशाच्या लोकशाहीवर घाव, पेगासस प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले; पेगाससप्रकरणावरून आता माघार नाही, राहुल गांधींचा इशारा

(My phone is hacked, situation more serious than Emergency: Mamata Banerjee )

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI