AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | काँग्रेसच्या ‘जैसे थे’ राजकारणावर टीका करण्यासाठी मोदींनी सांगितलेला अफलातून किस्सा वाचा, पाहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज चोहोबाजूनं टिका केली. (PM Narendra Modi slams Congress in parliament speech)

VIDEO | काँग्रेसच्या 'जैसे थे' राजकारणावर टीका करण्यासाठी मोदींनी सांगितलेला अफलातून किस्सा वाचा, पाहा
Narendra Modi
| Updated on: Feb 10, 2021 | 6:04 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज चोहोबाजूनं टिका केली. काँग्रेसच्या मानसिकतेवर आणि आहे तशीच स्थिती ठेवण्याच्या मानसिकतेवर टीका करताना मोदींनी तामिळनाडूमधील एक किस्सा लोकसभेत सांगितला. आम्ही बदल घडवण्यासाठी आलो आहोत आणि त्यासाठी प्रयत्न करणारच. साचलेलं पाणी रोगराई आणतं आणि वाहतं पाणी जीवन फुलवतं असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत. (Narendra Modi told Churchill cigar case Story)

काय आहे मोदींनी सांगितलेला तामिळनाडुतला किस्सा?

तामिळनाडुत साठच्या दशकात राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यावर विचार करण्यासाठी एक कमिशन बसवलेलं होतं. त्या कमिशनच्या चेअरमनकडे एक लिफाफा (पत्र) आला. त्यावर टॉप सिक्रेट असं लिहिलं होतं. त्यात एक अर्ज होता. अर्ज करणाऱ्याने मागणी केली होती की, माझा पगार वाढवला जावा. मी खूप वर्षापासून काम करतोय. इमानदारीने काम करतोय. चेअरमनने त्या अर्जदाराला उत्तर लिहिलं की, तुम्ही कोण आहात? काय करता? अर्जदारानं उत्तर पाठवलं, मी सीसीएच्या पदावर काम करतो. मुख्य सचिवांच्या बाजूला बसतो. उत्तर वाचून चेअरमनला आश्चर्य वाटलं. त्यानं पुन्हा विचारलं, हे सीसीए नेमकं काय आहे? आम्हाला तर काहीच माहीत नाही.

अर्जदारानं पुन्हा पत्र लिहून सांगितलं की, मी 1975 पर्यंत हे मी सांगू शकत नाही. मग चेअरमननं सांगितलं, मग तू माझं डोकं कशाला खातोयस, जे कमिशन 1975 नंतर येईल, त्यांच्याकडे पगारवाढीची मागणी कर. अर्जदाराला वाटलं, हे तर बिघडलं सगळं. त्यानं चेअरमनला पुन्हा उत्तर लिहिलं आणि सांगितलं सीसीएचा अर्थ आहे, चर्चिल्स सिगार असिस्टंट. हे माझं पद आहे आणि या पदावर मी काम करतो. 1940 मध्ये विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्यांना त्रिचीहुन सिगारेट जात होती. सीसीएचं काम होतं की, ती सिगारेट पोहोचली की नाही ते पाहाणं. 1945 मध्ये चर्चिल निवडणूक हरले. पण ते पद तसच राहीलं. सिगारेटचा सप्लायही कायम राहीला. देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतरही ते पद कायम राहीलं. त्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वत:च्या पगारवाढीची मागणी केली होती. जर आहे ती स्थिती बदलली नाही तर काय सुरु असतं त्याचं हे उदाहरण.

VIDEO | मोदींनी सांगितलेला किस्सा

संबंधित बातम्या

राज्यसभेत पवारांचा दाखला, मोदी म्हणाले ना खेळणार, ना खेळू देणार, मी तर खेळ बिघडवणार!

बाचाबाचीत पंतप्रधान मोदी संतापले; म्हणाले, अधीर रंजनजी आता जरा जास्तच होतंय

काँग्रेस धड स्वत:चही भलं करु शकत नाही आणि देशाचंही नाही; पंतप्रधान मोदींची टीका

(Narendra Modi told Churchill cigar case, Congress politics remains same all time)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.