AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या एनर्जी पार्कचे करणार भूमीपूजन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तीन महत्वाच्या योजनांच्या कामाचे भूमीपूजन करणार आहेत. Narendra Modi Development

नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या एनर्जी पार्कचे करणार भूमीपूजन, जाणून घ्या वैशिष्ट्ये
| Updated on: Dec 15, 2020 | 1:11 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तीन महत्वाच्या योजनांच्या कामाचे भूमीपूजन करणार आहेत. मोदींच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या हायब्रिड नवीकरणीय उर्जा पार्क प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान यासोबत कच्छमधील विकास प्रकल्पाचेही उद्घाटन करणार आहेत. (Narendra Modi will lay foundation development projects)

हायब्रिड रिन्यूएबल एनर्जी पार्कची वैशिष्ट्ये

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील विगहाकोट गावाजवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची उर्जा निर्मितीची क्षमता 30 हजार मेगावॅट म्हणजेच 30 गीगावॅट आहे. हा प्रकल्प 72 हजार 600 हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रात होणार आहे. या प्रकल्पात पवन उर्जा आणि सौर उर्जेचा वापर करुन वीज निर्मिती केली जाईल. हा प्रकल्प भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेपासून 6 किमी अंतरावर आहे. (Narendra Modi will lay foundation development projects and largest energy park )

प्रकल्प दोन विभागामध्ये

देशातील सर्वात मोठा प्रकल्प दोन भागात विभागला जाणार आहे. 72600 हेक्टरपैकी 49600 हेक्टर जमिनीवर सौर उर्जेद्वारे वीज निर्मिती केली जाईल. तर, दुसऱ्या विभागात 23 हजार हेक्टर जमीनीवर पवन उर्जेची निर्मिती केली जाल. येथील जमीन काही मोठ्या वीज कंपन्या म्हणजेच अदाणी ग्रुप, एनटीपीसी, गुजरात इंडस्ट्रीज पावर कंपनी, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे भारत सरकारच्या 175 गीगावॅट वीज निर्मिती करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी मदत होईल. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार सरकार या प्रकल्पात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Narendra Modi will lay foundation development projects and largest energy park )

दुसऱ्या प्रकल्पांचे भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑटोमेटेड मिल्क प्रोसेसिंग आणि पॅकिंग प्लांटचे भूमीपूजन करणार आहेत. या प्रकल्पात सरकार 121 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाची प्रतिदिन 2 लाख लीटर दूधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असेल. नरेंद्र मोदी गुजरातमधील सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होतील. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर गुजरातमधील मलखपत आणि मुंद्रा या सराख्या जिल्ह्यातील जवळपास 8 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या:

मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार; कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

(Narendra Modi will lay foundation development projects and largest energy park )

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.