आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन, मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती राहणार उपस्थित!
हे अधिवेशन आदीवासी गौरव वर्ष (15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025) साजरे करण्यासाठीच्या अनेक कार्यक्रमांतील एक कार्यक्रम आहे. आदिवासी समुदायाचे योगदान, संघर्ष, नेतृत्त्वाचा आदर, सन्मान करण्यासाठी या आदिवासी गौरव वर्ष साजरे करण्यात आले होते.

देसभरातील आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तसेच वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सरकार आदिवासी विकासासाठी प्रयत्न करते. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी PM-JANMAN तसेच धरती आबा अभियानाच्या साथीने आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदी कर्मयोगी अभियानावर आधारित राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित
दिल्लीतील विज्ञान भवनात 17 ऑक्टोबर रोजी हे अधिवेशन आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींसोबतच आदिवासी व्यवहारमंत्री, अन्य मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, केंद्र तसेच राज्य सरकारांचे सचिव, जिल्हाधिकारी, उपायुक्त तसेच देसभरातून आलेले अतिथी तसेच आदी कर्मयोगी अभियानाचे साथी हेदेखील उपस्थित राहतील.
पुरस्कार, सन्मानपत्र दिले जाणार
हे अधिवेशन आदीवासी गौरव वर्ष (15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025) साजरे करण्यासाठीच्या अनेक कार्यक्रमांतील एक कार्यक्रम आहे. आदिवासी समुदायाचे योगदान, संघर्ष, नेतृत्त्वाचा आदर, सन्मान करण्यासाठी या आदिवासी गौरव वर्ष साजरे करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता आदी कर्मयोगी अभियानावर आधारित राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार?
या परिषदेत शिक्षण कौशल्य विकास, आरोग्य आणि पोषण, उपजीविका आणि उद्योजकता, पायाभूत सुविधा (गृहनिर्माण, वीज, रस्ते, कनेक्टिव्हिटी, शासन आणि संस्थात्मक बळकटीकरण या पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या कार्यक्रमात आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्या राज्य, जिल्हा, संस्था तसेच व्यक्तिंना सन्मानित केले जाईल.
आदी कर्मयोगी अभियाला कधीपासून सुरुवात झाली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील धार येथे आदी कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ केला होता. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक महिला बचत गटांना तसेच युवकांना गव्हर्नंस प्रोसेस लॅबच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री काय म्हणाले?
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनाविषयी देशातील वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या अधिवेशनच्या माध्यमातून आदी कर्मयोगी अभियानाचा विचार, आकांक्षांना ठोस रुप देणारा एक मोठा मंच आहे. या कार्यक्रमात सर्वोत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करून सेवा, उत्तरदायीत्वाच्या भावनेला आणखी मजबूत आणि प्रबळ केले जाईल, असे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल उरांव म्हणाले आहेत. आजघडीला आदी कर्मयोगी अभियान हे तळागाळातील प्रशासनासाठी एक आंदोलन म्हणून नावारुपाला आले आहे. आज प्रत्येक आदिवासी गाव आत्मनिर्भरता, नवोन्मेष, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पुरवण्याचं एक मोठं केंद्र बनत आहे, असे आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्री दुर्गादास उईके म्हणाले आहेत.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव विभु नायर यांनीदेखील दिल्लीत होणाऱ्या अधिवेशनावर प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय आकाक्षा समजून घेण्यासाठी तसेच समन्वयाला आणखी मजबूत करण्यासाठी सोबतच आदिवासी गाव व्हिजन 2030 च्या रुपरेषेला गती देण्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रयत्न आहे, असे विभू म्हणाले आहेत.
