AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत संघाची तीन दिवस बैठक, प्रांत प्रचारकांशी होणार चर्चा

दिल्लीतील केशवकुंज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारकाची बैठक होत आहे. या बैठकीत 2025-26 च्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांची योजना, नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण वर्गांची समीक्षा आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा प्रवास कार्यक्रम यावर चर्चा होईल. देशभरातील प्रांत आणि क्षेत्र प्रचारक या बैठकीत सहभागी होतील.

दिल्लीत संघाची तीन दिवस बैठक, प्रांत प्रचारकांशी होणार चर्चा
mohan bhagwatImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 23, 2025 | 2:24 PM
Share

सालाबाद प्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नवी दिल्लीत बैठक होत आहे. अखिल भारतीय स्तरावरील प्रांत प्रचारकाची बैठक होत आहे. ही बैठक दिनांक 4, 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. राजधानी दिल्लीतील केशवकुंज या संघाच्या कार्यालयात ही बैठक होत आहे.

देशभरातील सर्व प्रांत प्रचारक, सह प्रांत प्रचारक तसेच क्षेत्र प्रचारक व सह क्षेत्र प्रचारक हे बैठकीस उपस्थित राहणार आहेत. संघाच्या संघटन रचनेत एकूण 11 क्षेत्रे आणि 46 प्रांत स्थापन करण्यात आले आहेत. या बैठकीत संघ प्रेरित विविध संस्थांच्या अखिल भारतीय संघटन मंत्र्यांचा देखील सहभाग असणार आहे. मागील मार्चमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बैठकीनंतर देशभरात एप्रिल, मे आणि जून महिन्यांत संघाच्या विविध स्तरांवरील प्रशिक्षण वर्ग पार पडल्यानंतर येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते.

प्रवास कार्यक्रमांवर चर्चा

या बैठकीत नुकतेच पार पडलेले प्रशिक्षण वर्ग, त्यांचा वृत्तांत व समीक्षा, येणाऱ्या शताब्दी वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची योजना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा वर्ष 2025-26 या वर्षातील प्रवास कार्यक्रम यावर चर्चा होणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष (2025-26) हे येणाऱ्या विजयादशमीपासून म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन पुढील वर्षीच्या विजयादशमी 2026 पर्यंत चालणार आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?

या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये यांच्यासह सर्व अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख, सह प्रमुख आणि कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीसाठी सरसंघचालक यांचे 28 जून रोजी दिल्लीमध्ये आगमन होणार आहे.

Follow Us
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल