AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘योग हा सनातन धर्माचा सार’, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रामदेव बाबांचे भाष्य

हरियाणातील कुरुक्षेत्र येथे बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी एक लाखाहून अधिक लोकांना एकाचवेळी योगसाधना केली.

'योग हा सनातन धर्माचा सार', आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रामदेव बाबांचे भाष्य
Ramdev baba
| Updated on: Jun 21, 2025 | 10:55 PM
Share

आज जगभरात मोठ्या उत्साहात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम पतंजली योगपीठ, हरियाणा योग आयोग आणि हरियाणाच्या आयुष विभागाने आयोजित केला होता. या योग सत्राला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण हे उपस्थित होते, यावेळी एक लाखाहून अधिक लोकांना एकाचवेळी योगसाधना केली.

बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले की, ‘पतंजली योग समितीद्वारे भारतातील सर्व 650 जिल्ह्यांमध्ये मोफत योग प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या वर्षीचा योग दिनाचा विषय “एक पृथ्वी, एक आरोग्य” होता. योग ही एक जागतिक चळवळ बनली आहे आणि जगभरात २ अब्जाहून अधिक लोक त्याचा अभ्यास करत आहेत. योग हा सनातन धर्माचा सार आहे, जो आपल्या परंपरा आणि निसर्गात रुजलेला आहे.’ जागतिक स्तरावर योगाचा प्रचार केल्याबद्दल आणि सर्व नेत्यांना योगाचा प्रचार करण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल रामदेव बाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘योगी योद्धा’ असे केले.

पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री हे सर्व नेते योगाचा सराव करतात, यामुळे योगाचे महत्व लक्षात येते. योगामुळे देशाचा आरोग्यसेवा खर्च कमी होऊ शकतो, जो सध्या दरवर्षी 10 लाख कोटी रुपये आहे. जर देशातील प्रत्येकाने योगाचा सराव केला तर हे आरोग्य बजेट शून्यावर आणता येईल”.

आपल्या भाषणात पुढे बोलताना रामदेव बाबांनी योगाला भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याशी देखील जोडले. तसेच उपस्थित नागरिकांना स्वदेशी उत्पादने वापरण्याचे आवाहन केले. पतंजली त्यांच्या ‘प्रोस्परिटी फॉर चॅरिटी’ मोहिमेअंतर्गत देशाची सेवा करण्यासाठी नफ्याच्या 100 % योगदान देते अशी माहितीही रामदेव बाबांनी दिली.

आचार्य बालकृष्ण यांनी बोलताना म्हटले की, ‘शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी, पतंजलीने भारतीय शिक्षा मंडळ (BSB) सोबत मिळून पतंजली गुरुकुलम आणि आचार्यकुलम सारख्या संस्था सुरू केल्या आहेत, ज्यामुळे देशाला जुन्या शिक्षण व्यवस्थेपासून मुक्त करता येईल.’

आचार्य बालकृष्ण पुढे म्हणाले की, दररोज फक्त 30 ते 60 मिनिटे योग केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकते, योगामुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगता येते. पतंजली रिसर्च फाउंडेशनने जागतिक स्तरावरील आघाडीच्या जर्नल्समध्ये योगावरील शेकडो शोधनिबंध प्रकाशित केले आहेत असंही बालकृष्ण यांनी सांगितले.

दरम्यान, हरियाणामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये 11 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला, तर ब्रह्म सरोवर येथे एक लाखांहून अधिक लोकांनी एकत्र योग केला. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मंत्री आरती राव, खासदार नवीन जिंदाल, आयुष महासंचालक संजीव वर्मा आणि पतंजली आणि हरियाणा योग आयोगाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी राज्यभर योगाचा प्रसार करण्यासाठी आणि हरियाणाला व्यसन आणि तणावमुक्त करण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे म्हटले.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.