National Technology Day 2022 : कसा साजरा होतो नॅशनल टेक्नोलॉजी डे? महत्व आणि इतिहास, वाचा एका क्लिकवर

या दिवसाशी संबंधित एक प्रमुख आणि मोठं कारणही आहे, ज्यामुळे हा दिवस फक्त 11 मे रोजी साजरा केला जातो.  11 मे 1998 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती.

National Technology Day 2022 : कसा साजरा होतो नॅशनल टेक्नोलॉजी डे? महत्व आणि इतिहास, वाचा एका क्लिकवर
कसा साजरा होतो नॅशनल टेक्नोलॉजी डे? महत्व आणि इतिहास, वाचा एका क्लिकवरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:06 AM

मुंबई : कुठल्याही देशाला चांगली आर्थिक प्रगती करायची असेल तर त्याला तंत्रज्ञानाची जोड असणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस भारतात (National Technology Day 2022) दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. भारताने (India) तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात किती प्रगती केली आहे आणि आतापर्यंत कोणती मोठी कामगिरी केली आहे हे लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. तसे, या दिवसाशी संबंधित एक प्रमुख आणि मोठं कारणही आहे, ज्यामुळे हा दिवस फक्त 11 मे रोजी साजरा केला जातो.  11 मे 1998 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती. त्यानंतर भारताचे नावही अण्वस्त्रसमृद्ध देशांच्या यादीत समाविष्ट झाले आहे आणि कोणीही आमच्याकडे डोळसपणे पाहू शकत नाही, असा इशारा जगाला भारताने दिला.

अनुचाचणीनंतर मोठा बदल

पोखरणमधील या अणुचाचणीचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले होते. यानंतर, पुढच्या वर्षी या दिवशी म्हणजेच 11 मे 1999 रोजी भारतात पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 11 मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे महत्त्वही वाढते. त्रिशूल हे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे आपल्या लक्ष्यावर वेगाने मारा करते. याशिवाय या दिवशी भारताचे पहिले विमान हंसा-3 ने उड्डाण केले. नॅशनल एरोस्पेस लॅबने ते तयार केले आहे. हे दोन आसनी हलके विमान आहे, जे पायलट प्रशिक्षण, हवाई फोटोग्राफी आणि पर्यावरणीय प्रकल्पांसाठी वापरले जाते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आयोजित करते

भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या योगदानाचे स्मरण करून तत्कालीन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय दरवर्षी 11 मे रोजी त्याचे आयोजन करते. त्यासाठी दरवर्षी एक थीमही ठरवली जाते. याशिवाय तंत्रज्ञान संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आता अलिकडेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची हाक दिली आहे. पण भारताला खऱ्या अर्थाने पूर्ण आत्मनिर्भर बनवायचे असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाला देशाच्या प्रगतीत खूप महत्व आहे. त्यामुळे हा दिवस भारतासाठी मोठा आहे, त्यामुळेच भारतभर हा साजरा होतो.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.