AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मार्टफोनच्या इतिहासातला सर्वात मोठा ‘कॅमेरा सेन्सर’ होणार लॉन्च, सॅमसंग सादर करणार 200MPचा मोबाइल!

स्मार्टफोन तंत्रज्ञान हे सर्वात वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आहे. आता स्मार्टफोनच्या दुनियेत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे, जो कॅमेरा सेटअपमध्ये दिसणार आहे. वास्तविक, 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा मोबाइल मार्केटमध्ये धूम करणार आहे.

स्मार्टफोनच्या इतिहासातला सर्वात मोठा ‘कॅमेरा सेन्सर’ होणार लॉन्च, सॅमसंग सादर करणार 200MPचा मोबाइल!
Samsung Galaxy S23 UltraImage Credit source: Youtube
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: May 10, 2022 | 3:33 PM
Share

स्मार्टफोन तंत्रज्ञान हे सर्वात वेगाने बदलणारे तंत्रज्ञान मानले जाते. आता स्मार्टफोनच्या दुनियेत (Smartphones) एक नवीन प्रयोग साकारला जाणार आहे. जो मोबाईलच्या कॅमेरा सेटअपमध्ये दिसणार आहे. आत्तापर्यंत स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेल (108MP कॅमेरा फोन) पर्यंत कॅमेरा आहे. सर्व प्रथम, 200-मेगापिक्सेल कॅमेरा Samsung Galaxy S23 Ultraमध्ये दिसेल. दक्षिण कोरियातील प्रकाशन ईटी न्यूजने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 200 मेगापिक्सेल सेन्सरची नवीन आवृत्ती पूर्ण होणार आहे आणि भविष्यात तो फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर 200-मेगापिक्सलचा कॅमेरा (200-megapixel camera) वापरला जाऊ शकतो. मोबाईल डिव्हिजन आणि इलेक्ट्रो मेकॅनिक्स डिव्हिजन संयुक्तपणे हा कॅमेरा तयार करत आहेत. जेथे मोबाइल विभाग 30 टक्के काम करेल तर इलेक्ट्रो मेकॅनिक्स विभाग (Department of Electro Mechanics) 70 टक्के काम करेल.

2020मध्ये आला होता 108 मेगापिक्सेल कॅमेरा

2020 मध्ये, सॅमसंगने 108 मेगापिक्सेलसह Samsung Galaxy S20 Ultra सादर केला होता. आता काही वर्षांनी म्हणजे 2023मध्ये, कंपनी 200 मेगापिक्सेल सेन्सर जारी करेल. हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, जो इतर अनेक विशेष कॅमेरा सेन्सर्ससह सादर केला जाईल.

2021मध्ये मोठ्या सेन्सरची घोषणा

सॅमसंगने 2021मध्ये त्याचा 200MP कॅमेरा सेन्सर, ISOCELL HP1 ची घोषणा केली. मोटोरोला आणि Xiaomiसारख्या इतर ब्रँडने आधीच सॅमसंगचा 200MP सेन्सर कंपनीने त्याच्या एका डिव्हाइसवर वापरण्यापूर्वीच समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Samsung S23 Ultraमध्ये 200 मेगापिक्सेल कॅमेरा

एका रीपोर्टनुसार, Samsung आगामी Galaxy S23 Ultra स्मार्टफोनमध्ये प्राथमिक कॅमेरा म्हणून समाविष्ट करण्यासाठी त्याचा सर्वात रिझोल्यूशन कॅमेरा सेन्सर अपग्रेड करत आहे. अपग्रेड केलेला 200MP सेन्सर ISOCELL HP3 म्हणून ओळखला जाईल.

Samsung S23 Ultraमध्ये नवीन प्रोसेसर

सॅमसंग पुढील वर्षी त्याच्या स्मार्टफोन्सच्या फ्लॅगशिप लाइनअपमध्ये Qualcommचा नवीनतम फ्लॅगशिप प्रोसेसर किंवा इनहाऊस चिपसेट वापरू शकतो, आतापर्यंत लीक रिपोर्ट्सनुसार, कंपनी Qualcomm Snapdragon 8 Gen 1 Plus चिपसेट वापरेल.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान