AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naxalites Encounter : 36 तास चकमक, 20 नक्षलवादी ठार, एकावर तर 1 कोटीचा इनाम, छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये धुमश्चक्री सुरूच

Naxal Combing Operation : गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहिम उघडण्यात आली आहे. नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरेड मोडण्यात येत आहे. छत्तीसगडमधील घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 20 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आले.

Naxalites Encounter :  36 तास चकमक, 20 नक्षलवादी ठार, एकावर तर 1 कोटीचा इनाम, छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये धुमश्चक्री सुरूच
नक्षल चळवळीला हादरा
| Updated on: Jan 21, 2025 | 1:51 PM
Share

मोहम्मद इरफान, टीव्ही9 प्रतिनिधी, गडचिरोली : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 36 तास उलटूनही अजूनही ही चकमक सुरूच आहे.  छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 20 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. बिजापूर, सुकमा-तेलंगाणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशाच्या सीमावर्ती भागत सुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांची मोठी फळी निकामी

गेल्या काही वर्षात राष्ट्रविरोधी नक्षलवादी मोहिमेचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पोलीस आणि खबऱ्यांच्या मार्फत नक्षलवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सध्या उडालेल्या चकमकीत नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे. या चकमकीत मोठे कॅडरचे नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  काल रात्री एक वाजेपासून हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाले. पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चकमक चालली.  आताही चकमक सुरू असल्याचे समोर येत आहे.

एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला चलपती ठार

छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. उडीसा राज्यातील स्टेट कमिटीच्या चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास 30 वर्षापासून नक्षल चळवळीत सहभागी होता.

या चकमकीत दोन महिलाही कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. छत्तीसगड पोलीस सीआरपीएफ आणि इंटरेस्टेड पोलीसांच्या मदतीने ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

राज्याच्या सीमेवर मोठी चकमक

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात छत्तीसगड पोलीस सीआरपीएफने मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी पोलीस पथकाचे जवान नक्षल ऑपरेशनवर तैनात आहेत. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या लक्ष छत्तीसगड राज्याकडे लागले आहे. याठिकाणी नक्षल्यांचा बिमोड करण्यात येत आहे. छत्तीसगड पोलीस अधिकाऱ्यांकडून व सीआरपीएफ कडून केलेल्या आपरेशनावर गृह मंत्रालयाचे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्रीय गृह विभागाच्या नक्षल अभियानावर बारकाईने लक्ष आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती जंगलात भागात ऑपरेशन सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.