TRP तपासात NBA मुंबई पोलिसांच्या पाठिशी, सीबीआय चौकशी मागे घेण्याची मागणी

न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनने (NBA) देखील या प्रकरणी भूमिका घेत टीआरपी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश मागे घेण्याची मागणी केली.

TRP तपासात NBA मुंबई पोलिसांच्या पाठिशी, सीबीआय चौकशी मागे घेण्याची मागणी

नवी दिल्ली : देशभरात मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्या प्रकरणी केलेल्या कारवाईचे पडसाद उमटत आहेत. आता न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनने (NBA) देखील या प्रकरणी भूमिका घेत टीआरपी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश मागे घेण्याची मागणी केली. तसेच रात्रीतून टीआरपी घोटाळ्याचं प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केल्यानं संशय व्यक्त केला आहे. यातून एनबीएने अप्रत्यक्षपणे मुंबई पोलिसांच्या तपासाला पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे (NBA demand government to immediately withdraw CBI probe in TRP Scam).

एनबीएने म्हटलं आहे, “सरकारने टीआरपी घोटाळ्याची सीबीआय चौकशीचे आदेश तात्काळ मागे घ्यावेत. ज्या प्रकारे रात्रीतून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास संस्था सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आली त्यावरुन अनेक शंका उपस्थित होत आहेत.”

हेही वाचा : TRP Scam : एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक, Republic TV च्या अधिकाऱ्यांची उद्या चौकशी

दरम्यान, एनबीएने अन्य एका प्रकरणात सुशांत सिंह प्रकरणी चुकीचं वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना माफी मागण्याचे निर्देशही दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील टीआरपी केसची चौकशी सीबीआयकडे

मुंबईत पोलिसांनी टीआरपी घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक सत्र आणि चौकशी सुरु केली. यानंतर यावर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, नंतर लगेचच उत्तर प्रदेशमधील हे टीव्ही चॅनेलशी संबंधित बोगस टीआरपी घोटाळ्याचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. उत्तर प्रदेशातील गोल्डन रॅबिट कम्युनिकेशन चालवणाऱ्या कमल शर्मा याने टीआरपी घोटाळ्यासंदर्भात तक्रार केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी टीआरपी प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने  तात्काळ यूपीतील टीआरपी घोटाळ्यासंदर्भातील केस सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांकडे 17 ऑक्टोबरला टीआरपी घोटाळ्यासंदर्भात एक केस दाखल झाली होती. हजरतगंजमधील कमल शर्मा या व्यक्तीने यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. त्याने केलेल्या तक्रारीत कोणत्याही चॅनेलचे नाव घेण्यात आलेले नाही. सर्व चॅनेलसची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शर्माने केली आहे.

मुंबई पोलिसांकडूनही बोगस टीआरपी प्रकरणी चौकशी सुरू

मुंबई पोलिसांनी 6 ऑक्टोबरला बोगस टीआरपी प्रकरणी एफआयआर नोंदवली होती. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत हे प्रकरण उघडकीस आणले होते. या दरम्यान रिपब्लिक टीव्ही सह इतर दोन मराठी चॅनेलच्या नावाचा उल्लेख पोलिसांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही जणांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

बोगस टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले होते. रिपब्लिक टीव्हीचे वकील हरिश साळवे यांनी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च नायालयाचा टीआरपी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास नकार

दरम्यान, टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा किंवा हा गुन्हा तपासासाठी सीबीआय कडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, हा गुन्हा रद्द करता येणार नाही, त्याचप्रमाणे सीबीआयकडे ही वर्ग करण्याची आवश्यकता नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं. तसेच, मुंबई पोलीस तपास करत आहेत. त्या तपासात तुम्ही सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना दिले होते.

संबंधित बातम्या :

TRP Scam | उत्तर प्रदेशातील टीआरपी केसची चौकशी सीबीआयकडे, केंद्राचा निर्णय

TRP Scam | गुन्हा रद्द करता येणार नाही, सीबीआयकडे प्रकरण वर्ग होणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका

TRP Scam | ‘रिपब्लिक’ची मागणी अमान्य, अर्णबच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घ्या, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

NBA demand government to immediately withdraw CBI probe in TRP Scam

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *