AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार दिल्लीत; सरकार विरोधात मोर्चेबांधणी की यूपीएच्या अध्यक्षपदाची?

शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. (NCP chief Sharad Pawar in delhi, will set political agenda?)

शरद पवार दिल्लीत; सरकार विरोधात मोर्चेबांधणी की यूपीएच्या अध्यक्षपदाची?
| Updated on: Dec 28, 2020 | 12:57 PM
Share

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला तरी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. पवार यावेळी यूपीएच्या अध्यक्षपदाचीही मोर्चेबांधणी करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला असल्याने पवारांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (NCP chief Sharad Pawar in delhi, will set political agenda?)

शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या अनेक बैठकाही झाल्या. मात्र, त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून निवेदनं दिल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच कृषी कायद्याचं समर्थन करत विरोधकांनी भ्रमित केल्यामुळेच शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी पवार दिल्लीत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.

विरोधकांना एकत्र करून हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधकांना एकत्र करून सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत पवार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी पवारांनी सर्व विरोधी पक्षांची उद्या दिल्लीत बैठक बोलावल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपा सुप्रिमो मायावती उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पवारांचा काँग्रेसला शह?

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असली तरी या माध्यमातून विरोधकांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मधल्या काळात यूपीएच्या चेअरमनपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे विरोधकांना एकत्र करून शेतकरी प्रश्नावर सरकारला कायदा मागे घेण्यास भाग पाडल्यास पवारांचं विरोधी पक्षातील वजन आपोआपच वाढेल आणि यूपीएचे अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे पवारांनी विरोधकांची उद्या बोलावलेली बैठक ही काँग्रेसला एकप्रकारे शहच असल्याचंही बोललं जात आहे.

राहुल गांधींची गैरहजेरी?

काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांची आजी आजारी असल्याने परदेशात गेले आहेत. त्यामुळे ते उद्याच्या बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या राहुल गांधी बैठकीला गैरहजर राहिल्यास ही बैठक पवारांच्या कलानेच पार पडेल असंही बोललं जात आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीवर भविष्यातील राजकीय गणितं अवलंबून असल्याने या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (NCP chief Sharad Pawar in delhi, will set political agenda?)

संबंधित बातम्या:

शरद पवार आधी यूपीएचे चेअरमन होणार, नंतर पंतप्रधान? कोण काय म्हणतंय?

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

शेतकरी आंदोलन भरात असताना राहुल गांधी इटलीला का गेले? वाचा काँग्रेस काय म्हणतेय?

(NCP chief Sharad Pawar in delhi, will set political agenda?)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.