Corona Cases in India | कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले

आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. (New Corona Cases in India)

Corona Cases in India | कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले
कोरोना व्हायरस
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 10:24 AM

नवी दिल्ली :देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 29 हजार 942 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 3 हजार 876 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. परवाच्या तुलनेत (3 लाख 66 हजार 161) नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुन्हा दिलासा मिळाला आहे (New 329942  Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 29 हजार 942 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 876 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 49 हजार 992 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 37 लाख 15 हजार 221 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 27 लाख 10 हजार 66 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,29,942

देशात 24 तासात मृत्यू – 3,876

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,56,082

एकूण रुग्ण – 2,26,62,575

एकूण मृत्यू – 2,49,992

एकूण डिस्चार्ज – 1,90,27,304

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,15,221

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 17,27,10,066 (New Corona Cases in India)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

संबंधित बातम्या :

कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘कोविडॉलॉजिस्ट’, त्यांचे हात मजबूत करणे प्रत्येकाचे कर्तव्य, शिवसेनेकडून स्तुती

(New 329942  Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.