AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाकधूक… टेन्शन… चिंता संपली… अखेर नीट परीक्षेची तारीख जाहीर… पटकन चेक करा; रात्रभर दिल्लीत मोठ्या घडामोडी

नीट परीक्षा 2026 ची तारीख जाहीर करण्यात आली. पेपरफुटीमुळे 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली.

धाकधूक... टेन्शन... चिंता संपली... अखेर नीट परीक्षेची तारीख जाहीर... पटकन चेक करा; रात्रभर दिल्लीत मोठ्या घडामोडी
NEET Exam Date
| Updated on: May 15, 2026 | 10:08 AM
Share

नीट परीक्षा 2026 देशभरात 3 मे 2026 रोजी घेण्यात आली. मात्र, या परीक्षेनंतर पेपरफुटीचा गंभीर आरोप करण्यात आली. थेट प्रकरण सीबीआयकडे पोहोचले. सीबीआयने प्राथमिक तपासानुसार, तात्काळ सर्व परीक्षा प्रणाली थांबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार, 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. राजस्थान, हरियाणा येथील काही प्रकरण पुढे आली. थेट नाशिक आणि अहिल्यानगरमधून काहींना अटक करण्यात आली. लातूरचेही कनेक्शन पुढे आले. देशभरात नीट परीक्षेचा पेपरफुटला. सीबीआय या प्रकरणात तपास करत आहे. नीट परीक्षाचा पेपर काहींच्या फोनवर अगोदरच आला होता. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत.

यादरम्यानच आता थेट नीट परीक्षा 2026 ची नवीन तारीख जाहीर करण्यात आलीये. 21 जून 2026 रोजी नीट परीक्षा देशभरात पार पडणार आहे. नवीन तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट परीक्षा द्यावी लागणार आहे. या पेपरफुटीमुळे मोठा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. पेपरफुटीचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत एक बैठकही घेतली. आता नवीन तारीख जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासाकरिता वेळ देण्यात आला. नीट परीक्षा 2026 चा पेपर नक्की कसा फुटला याबाबत एक एक करून माहिती पुढे येत आहे. कसून तपास सीबीआय या प्रकरणात करत आहे. 21 जून रोजी पुन्हा एकदा नीट परीक्षा होणार आहे. नाशिकहून थेट राजस्थानला नीट परीक्षाचा पेपर पोहोचला.

राजस्थानहून हरियाणाला हा पेपर गेला. मोठे जाळे असल्याची माहिती मिळत आहे. आता 21 जून रोजी होणारा नीटचा पेपर फुटणार नाही, याबाबत काळजी घेतली जात आहे. या प्रकरणात काही मोठे नावेही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयोगाने अगोदरच सीबीआयला सर्व मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरोधात अनेक आंदोलनेही झाली. त्यानंतर नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर काल रात्री केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत उच्चस्तरीय बैठक सुरू होती. ही बैठक तब्बल दोन तास चालली. यादरम्यान नेट परीक्षेच्या पेपरफुटीबद्दल चर्चा झाली. अखेर आज नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, अभिषेक सिंह, राहुल सिंग आणि महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात