हेरगिरीच्या प्रकरणाला नवे वळण ? ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर आणखी एक युट्युबर तपासाच्या घेऱ्यात
या केसने एका नव्या प्रकारच्या धोक्याकडे लक्ष गेले आहे. ज्यात सोशल मीडियाचा उपयोग सायबर- एजन्ट्सद्वारे माहीती गोळा करण्यासाठी केला जात आहे. एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की गुप्तहेर कोणत्या सीमेवरुन येत नाही. तो तुमच्या फोनच्या स्क्रिनमागेही असू शकतो.

हरियाणाच्या हिस्सार येथील प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर आयबीने सखोल तपास सुरु केला आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरीचे काम करण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर आता या प्रकरणात ओडीशाचे कनेक्शन समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग ( आयबी ) आणि पुरीचे पोलीस संयुक्तपणे तपासाने आता पुरीपर्यंत याची लिंक पोहचली आहे. एजन्सी आता आणखी एका युट्युबरपर्यंत पोहोचली आहे.
ज्योती मल्होत्रा आपल्या व्लॉग्स आणि सोशल मीडिया कंटेन्टसाठी प्रसिद्ध होती. तिच्यावर भारतीय सैन्य दलाची ठिकाणी आणि महत्वाच्या ठीकाणांची माहीती पुरविण्याचा आरोप आला आहे. सायबर-गुप्तहेरीचे नेटवर्क या मागे असल्याचे म्हटले जात आहे. यात सोशल मीडिया आणि डिजिटल इन्फ्लुएंसर्सचा वापर देशातील अंतर्गत माहीती लिक करण्यासाठी केला जात आहे.
सप्टेंबर २०२४ पासून ज्योती मल्होत्रा हिने पुरीचा दौरा केला होता. त्यावेळी तिने जगन्नाथ मंदिर आणि त्याच्या जवळील सरकारी परिसरातील मंदिराचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीत केले होते. गुप्तचर खात्याला संशय आहे की ही माहीती तिने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म आधारे पाकिस्तानातील हस्तकांना पुरविली असावी. तपास यंत्रणा याचाही तपास करीत आहेत की ज्योती या दरम्यान ओडीशाच्या अन्य एक युट्युबर प्रियंका सेनापती हिच्या संपर्कात होती तिचे आणि ज्योतीचे संबंध कसे होते याचा तपास सुरु आहे.
ज्योती मल्होत्रा आणि ओडिशाच्या पुरी येथील कंटेन्ट क्रिएटर प्रियंका सेनापती यांच्यात संबंध असल्याचा संशय असल्याने गुप्तचर विभागाने (IB) पुरी पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे तपास सुरु केला आहे. ज्योतीने सप्टेंबर २०२४ मध्ये पुरी येथील दौरा केला होता. या वेळी जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आणि आजूबाजूच्या महत्वाच्या इमारतींचे चित्रीकरण केले होते. या संवेदनशील डेटा तिने परदेशी हस्तकांना पाठवल्याचा संशय आहेय. त्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी पुरी येथील युट्युबर प्रियंका सेनापती हीची चौकशी केली आहे.
प्रियंका सेनापती यांचे स्पष्टीकरण
पुरी येथील युट्युबर प्रियंका सेनापती यांनी सोशल मीडियावर येऊन आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की ज्योती केवळ एक युट्युब मैत्रीण होती. तिच्या व्यवहाराबद्दल अज्ञान होती. जर आपल्याला आधी कळले असते की ती शत्रूला आपल्या देशाची माहीती पुरवित आहे तर मी तिच्याशी मैत्री केलीच नसती. मी केवळ एक प्रोफेशनल कटेन्ट क्रिएटर या नात्याने तिला ओळखत होते. व्यक्तीगत पातळीवर तिच्या अशा बातम्यांमुळे आपण हादरलो आहोत असे सेनापती यांनी म्हटले आहे. आपण पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहोत.
ज्योती हिला अटक केल्यानंतर आणि प्रियांका हिच्या चौकशीनंतर जिथे परदेशी नागरिक किंवा संशयास्पद लोक फिरतात गुप्तचर संस्थांनी पुरी, भुवनेश्वर आणि इतर पर्यटन स्थळांवर गस्त वाढवली आहे. विशेषतः, ड्रोन, डीएसएलआर आणि व्यावसायिक कॅमेरे वापरून सार्वजनिक ठिकाणी शूट करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सवर लक्ष ठेवले जात आहे.
अनेक ठिकाणांवर तपास
हे प्रकरण एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतो आणि त्याच्या तळाशी जाण्यासाठी ओडिशापासून हरियाणापर्यंत अनेक ठिकाणांवर तपास सुरू आहे. जर प्रियंका सेनापती यांनी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली किंवा शेअर केली गेली हे सिद्ध झाले तर या प्रकरणात आणखी अटक होऊ शकते. सध्या, दोघांमधील संभाषणे, सोशल मीडियावरील संवाद आणि डेटा शेअरिंग यांचा सखोल तपास केला जात आहे.