AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NIA Pahalgam Investigation: हल्ला झाला त्यादिवशी ते दुकान बंद होते, NIA ला का आहे संशय ?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढला आहे. नवी दिल्लीने इस्लामबादच्या विरोधात कठोर स्ट्रेटेजिक पावले उचलली आहेत. या प्रकरणात १०० जणांची चौकशी आतापर्यंत झाली आहे.

NIA Pahalgam Investigation: हल्ला झाला त्यादिवशी ते दुकान बंद होते, NIA ला का आहे  संशय ?
| Updated on: May 04, 2025 | 4:33 PM
Share

NIA Pahalgam Investigation : पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुमारे दोन आठवड्यानंतर एनआयएला तपासात आता काही धागेदोरे सापडत आहेत. आतापर्यंत शेकडो संशयितांची चौकशी झाली होती. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केलेल्या तपासात एक स्थानिक दुकानदार तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. हा दुकानदार सह आणखी एक जण व्हिडीओत ‘अल्ला हु अकबर’ म्हणताना दिसला आहे. त्याचाही तपास सुरु आहे.

पहलगामवर २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी बैरसण खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या बेछुट गोळीबारात २६ जण ठार झाले होते. अतिरेकी हल्ल्यानंतर आता येथील स्थानिक दुकानदार रडारवर आले आहेत. या संशयिताने हल्ला होण्यापूर्वी १५ दिवसांपूर्वीच दुकान उघडले होते. परंतू ज्यादिवशी अतिरेकी हल्ला झाला त्या दिवशी मात्र त्याचे दुकान बंद होते. एनआयए आणि तपास यंत्रणांनी या दुकानदारांची चौकशी करीत आहेत.

घटनेच्या दिवशी दुकान उघडले नाही…

एनआयएला तपासात आढळले की स्थानिक दुकानदाराने १५ दिवसांपूर्वी दुकान सुरु केले होते. परंतू घटनेच्या दिवशी मात्र तो व्यक्ती दुकान उघडायला आला नव्हता. याचमुळे एनआयएच्या तपासात या व्यक्तीविषयी संयश निर्माण झाला आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार एनआयएने त्याची इंटरनेट एक्टीव्हीटी तपासली. या व्यक्तीचा कुठल्या अतिरेक्याशी संपर्क तर नाही ना याचा तपास केला जात आहे. एनआयएने सर्व स्थानिक लोकांची यादी बनवून त्यांची चौकशी केली आहे.

100 लोकांची चौकशी

या प्रकरणात आतापर्यंत १०० लोकांची चौकशी केली. यात टुरिज्मशी संबंधीत लोक, फोटोग्राफर, एडव्हेन्चर स्पोर्ट्स संबंधित लोक आणि दुकानदारांची चौकशी, काही लोकांना अतिरेक्यांनी त्यांची नावे विचारुन सोडून दिले होते. या सर्व लोकांची इनपुट्स आधारे चौकशी करीत तपास पुढे नेला आहे. आतापर्यंत १०० लोकांची चौकशी झाली आहे. या पूर्वी NIA च्या एक जिपलाईन ऑपरेटरची देखील चौकशी केली होती.जो हल्ल्यावेळी ‘अल्ला हू अकबर’ अशी घोषणा करताना व्हिडीओत दिसत आहेत. चौकशीत त्याने आपण घाबरलेलो असल्याने अशा प्रकारे घोषणा केल्याचे म्हटले आहे.

आरोपी आधीच्या हल्ल्यातही सहभागी होते का ?

परंतू हल्ल्यानंतर त्याने पोलीसांना फोन करण्याऐवजी त्याच्या मित्रांना फोन केला. हेच अतिरेकी २०२३ च्या कुलगामी हल्ला आणि पुंछमध्ये एअरफोर्सवर झालेल्या हल्ल्यातही सामील होते का याचा देखील एनआयए तपास करीत होते. सध्या एनआयएने या हल्ल्यामागे मोठी कट मानून तपास करीत आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.