नितीश कुमार यांनी काढला भाजप सरकारचा पाठिंबा, मणिपूरमध्ये मोठा झटका
मोठी बातमी समोर येत आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयुनं मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनं मणिपूरमध्ये भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूचे सहा आमदार निवडून आले होते. मात्र त्यातल्या पाच आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर जो एक आमदार जेडीयूमध्ये होता, त्यानं भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे. राज्यात जेडीयूचे सहा आमदार होते, त्यातील पाच जण आधीच भाजपच्या गोटात आले आहेत. त्यामुळे जरी मणिपूरमध्ये जेडीयूनं भाजपचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार स्थिर आहे.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल यूनायटेडने मणिपूरमध्ये बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारला दिलेला पाठिंबा वापस घेतला आहे. यामुळे भाजपला मणिपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूचे एकूण सहा आमदार होते. यातील पाच आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जेडीयूकडे फक्त एकच आमदार होता. आता त्यांनी पण आपला पाठिंबा वापस घेतला आहे. आता हा एकमेव आमदार विरोधी पक्षाच्या बाकावर बसणार आहे. जेडीयूचे आमदार यापूर्वीच भाजपमध्ये आल्यानं सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून, सरकार स्थित आहे. मात्र यातून नितीश कुमार यांनी केंद्र सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. कारण सध्या नितीश कुमार यांचा पक्ष केंद्रात एनडीए सरकारसोबत आहे.
मणिपूरमध्ये 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूनं एकूण सहा जागांवर विजय मिळवला होता.त्यातील पाच आमदारांनी या आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर आता एका आमदारानं आपला पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूर विधानसभेची एकूण सदस्य संख्या 60 आहे. त्यामध्ये भाजपचे एकूण 37 आमदार आहेत. जरी नितीश कुमार यांनी आपला पाठिंबा मागे घेतला असला तरी भाजपकडे पुरेस संख्याबळ असल्यामुळे सरकार स्थिर आहे. मात्र केंद्रात नितीश कुमार यांचा भाजपला पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.