मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळाले नाही; विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच दिली अशी शिक्षा

विद्यार्थ्यांच्या या करामतीमुळं गोंधळ उडाला. शाळेच्या बाहेर गर्दी जमा झाली. शिक्षण विभागाचे प्रमुख घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळाले नाही; विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच दिली अशी शिक्षा
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 4:26 PM

नवी दिल्ली : कोरोना काळात युपी (Uttar Pradesh) सरकारने सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (students) मध्यान्ह भोजनाचे पैसे दिले. पण, बलिया भागातील सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे (mid-day meal) पैसे मिळाले नाही. मध्यान्ह भोजनाचे पैसे मागितल्यानंतर शाळा प्रशासन त्याकडं दुर्लक्ष करत होते. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकासह पूर्ण कर्मचाऱ्यांना शाळेच्या खोलीत बंद केले. ही घटना बलिया विभागातील दुर्जनपूर कम्पोझिट विद्यालयात घडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना बंधक बनविले. वर्ग आठवीच्या धीरजने सांगितले की, कोविड काळात मिळणे अपेक्षित असलेले मध्यान्ह भोजनाचे पैसे अजूनपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत.

आम्ही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पैसे देण्यासंबंधात विचारणा केली. दोन-तीन महिन्यानंतर मिळतील, असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. पण, वाट पाहूनही मध्यान्ह भोजनाचे पेसे मिळाले नाही. त्यामुळं मुख्याध्यापकासह शिक्षकांना शाळेतील खोलीत बंद करण्यात आले. जोपर्यंत उच्च अधिकारी येणार नाही तोपर्यंत बंदिस्त करून ठेवणार होतो.

त्यानंतर विद्यार्थी शांत झाले

विद्यार्थ्यांच्या या करामतीमुळं गोंधळ उडाला. शाळेच्या बाहेर गर्दी जमा झाली. शिक्षण विभागाचे प्रमुख घटनास्थळी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना खोलीच्या बाहेर येऊ दिले.

मुख्याध्यापक म्हणाले,…

दुर्जनपूर कम्पोझिट विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जयप्रकाश यादव म्हणाले, चौथ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत. यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांना कळविले आहे. लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मध्यान्ह भोजनाचे पैसे मिळतील.

या घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. सरकारी योजना चांगल्या आहेत. पण, या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही अंमलबजावणी होत नसेल, तर अशा घटना घडतात. त्यामुळं अंमलबजावणीतील त्रृटी दूर करणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.