एकटा भारतच नाही तर ‘हे’ देश देखील आहेत पाकिस्तानचे शत्रू; या राष्ट्रानं आणलाय पाकच्या नाकात दम
पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढला आहे. मात्र पाकिस्तानचं फक्त भारताशीच शत्रुत्व नाहीये, तर आणखी बरेच असे देश आहेत, जे पाकिस्तानचे शत्रू आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच संघर्ष सुरू आहे.या सर्वांमध्ये काश्मीरचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे. पाकिस्तानकडून कायमच दहशतवादाला खतपानी घातलं जातं आहे. या दहशतवाद्यांचा उपयोग पाकिस्तानकडून भारताविरोधी कारवायांसाठी करण्यात येत आहे. भारतानं पाकिस्तानला अनेकदा उघडं पाडून देखील पाकिस्थानच्या नापाक हरकती सुरूच आहेत.
पाकिस्तानने केवळ भारताशीच शत्रूत्व घेतलं असं नाही तर त्यांचे देशांतर्गत देखील अनेक शत्रू आहेत. त्यातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे बलूच लिबरेशन आर्मी आहे.बलूचिस्थानाला स्वतंत्र देश घोषित करावं यासाठी हा संघर्ष सुरू आहे. बलूच लिबरेशन आर्मीकडून अनेकदा पाकिस्तानच्या सैन्यावर देखील हल्ले करण्यात आले आहेत.
पाकिस्तानचा तिसरा मोठा शत्रू म्हणजे अफगानिस्तान आहे. अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये देखील कटूता निर्माण झाली आहे. अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सिमा वाद आहे. पाकिस्तानने अफगानिस्तान सरकारविरोधात तालीबानला मदत केली आणि तेच तालीबानी आता पाकिस्तानमध्ये सरकार चालवत आहेत.
इराणसोबत देखील संबंध खराब – कट्टर मुस्लिम देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इराणसोबत देखील पाकिस्तानचे फार चांगले संबंध नाहीयेत, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सौदी अरेबिया पाकिस्तानला आपला मित्र मानतो, पण त्यांचे इराणसोबत खराब संबंध आहेत, त्यामुळे इराण देखील पाकिस्तानला पाण्यात पाहातो.
पाकिस्तानचे अमेरिकेसोबत देखील म्हणावे तितके चांगले संबंध नाहीयेत, पाकिस्तानकडून अमेरिकेवर देखील अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. अमेरिका आपल्याला यावेळी भारताविरोधात मदत करेल असं पाकिस्तानला वाटत होतं. मात्र अमेरिकेनं घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
