आता गुन्हेगारांची खैर नाही, देशातील या 7 प्रमुख रेल्वे स्थानकात आता AI ने निगरानी
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलणार आहे. या निर्णयांतर्गत आता रेल्वे स्थानकातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि निर्धोकपणे प्रवास करता यावा यासाठी एआय तंत्राचा वापर केला जाणार आहे.

भारतीय रेल्वेने आपली सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक मोठे पाऊल उचलले असून देशातील सात प्रमुख रेल्वे स्थानकात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रावर आधारित टेहळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या एआय तंत्रा अंतर्गत चेहरा ओळख प्रणाली (Facial Recognition System) केली जाणार आहे. या मुख्य उद्देश्य प्रवाशांची सुरक्षा वाढवणे असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम याद्वारे होणार आहे. यामुळे रेल्वे आणि रेल्वे परिसर सुरक्षेत मोठी वाढ होणार आहे.
ही अत्याधुनिक AI प्रणाली कसे काम करणार ?
ही अत्याधुनिक प्रणाली रेल्वे स्थानाकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मिळणाऱ्या व्हिडीओ फूटेजचे सातत्याने विश्लेषण करणार आहे. या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या डेटाबेसमध्ये दाखल सराईत गुन्हेगार, संशयित आणि बेपत्ता व्यक्तींचा चेहऱ्याशी लाईव्ह फुटचे तुलना होईल. जसा असा व्यक्ती कॅमेऱ्यात कैद होईल तसे सिस्टीम सुरक्षा एजन्सींना अलर्ट पाठवेल.
या तंत्रज्ञानामुळे केवळ आरोपींना पकडण्याचा उद्देश्य नाही. तर बेपत्ता मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शोधण्यात हे तंत्रज्ञान मोठी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हे तंत्रज्ञान त्यांच्या चेहऱ्यांना ओळखून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईल. ज्यामुळे अशा बेपत्ता व्यक्तींना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सोपवणे सोपे होईल. रियल टाईम निगरानी आणि जलद प्रतिक्रीयामुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था पहिल्या पेक्षा चोख होणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात या 7 स्थानकातून सुरुवात:
रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये देशातील सात महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांची निवड यासाठी केली आहे. जेथे AI-आधारित सुरक्षा प्रणाली स्थापन केली जाणार आहे.
1. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
2. नागपूर
3. नाशिक रोड
4. पुणे
5. वडोदरा
6. अहमदाबाद
7. गांधीनगर कॅपिटल
ही सर्व रेल्वे स्थानक प्रवाशांची होणारी गर्दी आणि महत्व यादृष्टीने निवडली आहे. येथे सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
सुरक्षा आणि सुविधेचा संगम:
या मोहिमेमुळे अशी आशा आहे की रेल्वे स्थानकांवर गुन्ह्यांची संख्या कमी होईल आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम अधिक कुशलतेने करायला मिळेल.हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या डिजिटल इंडिया आणि स्मार्ट गव्हर्नंस च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि भयमूक्त प्रवास करण्याचा आनंद मिळाणार आहे. भारतीय रेल्वे सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुगम प्रवास निश्चित करण्यासाठी प्रयत्नरथ आहे.
