AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता ते म्हणतील हनुमान, चंद्रावर सर्वात आधी गेला होता’, स्टॅलिनची बहीण कनिमोझी यांच्या वक्तव्याने देशभरात संताप

Kanimozhi statement on hanuman : तामिळनाडूमध्ये निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. त्यात कनिमोई करुणानिधी यांनी सनातन धर्म आणि हनुमान यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने संताप उसळला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

'आता ते म्हणतील हनुमान, चंद्रावर सर्वात आधी गेला होता', स्टॅलिनची बहीण कनिमोझी यांच्या वक्तव्याने देशभरात संताप
कनिमोझींचे वादग्रस्त वक्तव्य
| Updated on: Sep 14, 2025 | 3:54 PM
Share

दक्षिण भारतातील नेत्यांमध्ये सनातन धर्म, देवी-देवतांवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे. तामिळनाडूत निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. यापूर्वी स्टॅलिन यांच्या मुलाने सनातन धर्म संपवण्याचे विधान केले होते. ततर आता त्यांची बहीण कनिमोई करुणानिधी यांनी पुन्हा सनातन धर्माला लक्ष्य केले. मुदराई येथे एका सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. “एक चांगली गोष्ट आहे की, तामिळनाडूमध्ये असा राजकीय नेता नाही, जो म्हणेल की, चंद्रावर सर्वात आधी हनुमान गेला होता. ते असं पण म्हणतील की त्यांची आजी पण चंद्रावर गेली होती आणि ती अद्याप तिथेच थांबलेली आहे.” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावरून एकच संताप उसळला आहे.

तामिळनाडूतील मुलांना जर तुम्ही प्रश्न केला की, चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले तर तो खरं आणि योग्य उत्तर देईल. तो म्हणेल नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते. पण तुम्ही उत्तर भारतातील नेत्यांना विचाराल तर ते म्हणतील हनुमानानं चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यांनी यावेळी सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेतील अनेक नेते देवी-देवतांवर वारंवार टीका करून आपण पेरियरचे खरे शिष्य असल्याचे दाखवण्याचा, भासवण्याचा वारंवार प्रयत्न करतात. त्याचाच हा भाग असल्याचे दिसून येते.

सनातन धर्माला विरोध हे  राजकारण

डीएमके आणि या पक्षाचे नेते अनेक वर्षांपासून द्रविड आंदोलनाआडून सनातन धर्मावर वारंवार टीका करताना दिसतात. कधी रामायणाच्या पात्रावर ते शंका उपस्थित करतात. तर कधी देवी-देवतांवर खालच्या पातळीवरील टीका करतात.आता कनिमोई यांनी हनुमानावरून वाद तयार केला आहे. आक्रमणकर्त्यांनी प्रयत्न करूनही द्रविड संस्कृती टिकून राहिली. द्रविड आंदोलन हा त्याचाच भाग आहे. वोट बँकसाठी कनिमोई यांनी असं विधान केल्याचा दावा करण्यात येत आहे.

कनिमोईच्या वक्तव्याने संतापाची लाट

कनिमोईच्या वक्तव्याने देशभरात संतापाची लाट उसळली. समाज माध्यमांवर त्यांच्यावर जनतेचा राग फुटला. अनेक विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. इतर धर्माविषयी आणि इतर धर्माच्या प्रथांविषयी असं बोलण्याची कनिमोई यांनी हिम्मत दाखवावी असे आव्हान अनेक युझर्स आणि विरोधकांनी त्यांना दिले. सनातन धर्माला टार्गेट करण्याचे हे नवीन फॅड असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...