मंदिरात पूजा करताना आढळली अशी वस्तू, पुजार्याला बसला जबर धक्का, पोलिसांनाही फुटला घाम, भाविक रस्त्यावर, परिसरात कर्फ्यू
मंदिरामध्ये धक्कादायक वस्तू आढळून आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरात अज्ञात व्यक्तीकडून मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मंदिरामध्ये मांसाचे तुकडे आढळून आल्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मंदिरात मासांचे तुकडे आढळून आल्यानं स्थानिक लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे आता युद्ध पातळीवर या घटनेचा तपास सुरू आहे. हे मासांचे तुकडे मंदिरात नेमके कसे आले याचा शोध स्थानिक पोलीस घेत आहेत. त्यासाठी मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं जात आहे, भाविक आक्रमक झाले असून, याविरोधात तीव्र आंदोलन देखील करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना हैदराबादच्या टप्पाचबूतरा पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या एका मंदिरामध्ये घडली आहे.या मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून मासांचे तुकडे फेकण्यात आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक लोक चांगलेच आक्रमक झाले असून, आंदोलन देखील करण्यात आलं आहे. आरोपीला तातडीनं पकडावं अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत बोलताना येथील एका मंदिर समितीच्या सदस्यानं सांगितलं की कोणीतरी मंदिरात मासांचे तुकडे फेकले. पुजासाठी आलेल्या भाविकांनी हे तुकडे पाहिले. त्यानंतर ही घटना समोर आली.
भाविक रस्त्यावर उतरे
या धक्कादायक घटनेनंतर भाविकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोक रस्त्यावर उतरले.आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मोठं आंदोलन करण्यात आलं. याबाबत बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोणीतरी मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्याची बातमी आम्हाला समजली. त्यानंतर आम्ही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या मंदिर परिसरात मोठा फौजफाट तैनात केला. या घटनेचा तपास सुरू आहे. चार पथक तयार करण्यात आली आहेत. आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहोत. मात्र लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.