एकदा धूर केला की वर्षभर पुन्हा साप घरात येत नाहीत; आदिवासी लोकांची ही खास ट्रीक तुम्हालाही माहिती हवी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात साप दिसण्याचं प्रमाण वाढतं, साप घरात येऊ नयेत यासाठी आज आपण एका खास उपयाबाबत माहिती घेणार आहोत. आदिवासी लोक याच पद्धतीने आपला सापांपासून बचाव करतात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरामध्ये दिसण्याचं प्रमाण वाढतं, याचं मुख्य कारण म्हणजे साप बिळात किंवा अडोशाच्या ठिकाणी लपलेले असतात. मात्र पावसाळ्यात बिळात पाणी शिरतं, बिळात पाणी गेल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात आणि सुरक्षित निवारा शोधण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आपल्या घरात एखाद्या ठिकाणी काही अडचण असेल किंवा घराच्या ज्या भागामध्ये अंधार असतो, अशा ठिकाणी साप निवाऱ्याला येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळाबाहेर पडत असल्यामुळे सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात.
दरम्यान साप आपल्या घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय आहेत. काही विशिष्ट प्रकारचे झाडं असतात, असा दावा केला जातो की ती झाडं लावल्यास, त्याच्या विशिष्ट वासामुळे साप घरात येत नाहीत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की जंगलांमध्ये राहाणाऱ्या आदिवासी समजाकडे अशी एक भन्नाट ट्रिक आहे, ज्यामुळे साप घरातच काय, परिसरात देखील कधीच दिसत नाहीत.चला तर मग जाणून घेऊयात, साप घरात येऊ नये यासाठी काय करावं त्याबद्दल
आदिवासी लोक हे दूर जंगलात किंवा पाड्यावर राहतात, त्यांच्या घरात किंवा परिसरात साप दिसणं ही एक सामान्य गोष्ट आहे. जेव्हा त्यांच्या घरात किंवा परिसरात कुठेही साप दिसतो, तेव्हा ते मोहाच्य वृक्षाच्या बियापासून जो चोथा तयार होतो, तो जाळतात. त्यापासून निघणारा जो धूर असतो, त्यामुळे साप पुन्हा त्या जागी कधीच येत नाहीत , परिसरात सुद्धा दिसत नाही.
आदिवासी बांधवांमध्ये मोह या वृक्षाचं खूप महत्त्व आहे. याच्या बियापासून तेलाची देखील निर्मिती केली जाते. या बियांमधून तेल निघाल्यानंतर जो उरलेला चोथा आहे, तो हे लोक जपून ठेवतात. आणि जिथे साप निघेल किंवा निघण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी तो जाळला जातो. यापासून जो धूर निघतो, त्यामुळे साप तुमच्या आसपास देखील फिरकत नाही. साप घरात येऊ नये यासाठीचा हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
