राज्यपाल होणार?… छे छे… भाजपची केरळात सत्ता आल्यास मुख्यमंत्री व्हायचंय: ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मेट्रो मॅन ई श्रीधरन यांनी मोठं विधान केलं आहे. (Open To Chief Ministership If BJP Comes To Power In Kerala, says E Sreedharan)

राज्यपाल होणार?... छे छे... भाजपची केरळात सत्ता आल्यास मुख्यमंत्री व्हायचंय: 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 4:30 PM

त्रिवेंद्रम: भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मेट्रो मॅन ई श्रीधरन यांनी मोठं विधान केलं आहे. मला राज्यपाल होण्यात काडीचाही रस नाही. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास केरळचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान श्रीधरन यांनी केलं आहे. श्रीधरन हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यापूर्वीच त्यांनी हे मोठं विधान करून चर्चांना तोंड फोडलं आहे. (Open To Chief Ministership If BJP Comes To Power In Kerala, says E Sreedharan)

ई श्रीधरन यांनी मीडियाशी संवाद साधताना मन की बात बोलून दाखवली. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास राज्याला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यावर आणि आधारभूत संरचना विकसित करण्यावर आपला भर असेल. केरळात भाजची सत्ता यावी हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच मी राजकीय आखाड्यात उतर आहेत. राज्याच्या हितासाठी मी काम करणार आहे, असं श्रीधरन यांनी सांगितलं.

मोदींचा आदर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या कनेक्शन विषयीही त्यांनी मौन सोडलं. जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा व्हायची. मी त्यांचा आदर करतो. भाजपमध्ये प्रवेश करण्याचं तेही एक कारण आहे. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद सांभाळायला मी तयार आहे. मला राज्यपाल होण्यात रस नाही. ज्यांच्याकडे काहीच अधिकार नसते अशा प्रकारच्या संवैधानिक पदावर राहून राज्याच्या विकासासाठी योगदान देता येणार नाही, असंही ते म्हणाले.

रेल्वेसाठी श्रीधरन यांचं मोठं योगदान

श्रीधरन भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरी ते निवडणूक लढणार की नाही? याबाबत काहीच खुलासा झालेला नाही. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिकृत सुरुवात होणार आहे. श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. अनेक शहरातील रेल्वेंचा वेग वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी देशातील अनेक रेल्वे प्रकल्प हातात घेतले आणि वेळेतही पूर्ण केले. दिल्ली असो की कोलकाता आदी अनेक शहरांमध्ये मेट्रो घेऊन जाण्याचं श्रेय श्रीधरन यांनाच जातं. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबाबत विदेशातही त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.

56 वर्षांची कारकीर्द

ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. सध्या त्यांचं वय 89 वर्षे असून त्यांना 58 वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहेत. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते.

विविध पुरस्कारांनी सन्मानित

ई.श्रीधरन यांना भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केले आहे. फ्रान्स सरकारनं देखील श्रीधरन यांना 2005 मध्ये पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्कार दिला आहे.

2017 मध्ये राष्ट्रपतीपदासाठी नाव चर्चेत

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही. राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत या माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या, असं म्हटलं होते. जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन, असंही ते म्हणाले होते. (Open To Chief Ministership If BJP Comes To Power In Kerala, says E Sreedharan)

संबंधित बातम्या:

मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार

मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज; राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती : जयंत पाटील

(Open To Chief Ministership If BJP Comes To Power In Kerala, says E Sreedharan)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.