India-Pakistan : ‘मला वाटतं 5 विमानं पाडली’; भारत-पाक तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबजनक दावा, देशात वाद पेटणार

India-Pakistan Conflict : भारत-पाक संघर्षा दरम्यान ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे कंबरडे मोडले. पण भारताची यामध्ये किती विमान पाडल्या गेली यावरून पाक आणि इतरांचे दावे आहेत. भारताकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

India-Pakistan : मला वाटतं 5 विमानं पाडली; भारत-पाक तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबजनक दावा, देशात वाद पेटणार
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 19, 2025 | 9:55 AM

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. एकूण 9 ठिकाणी लष्कराने शत्रूंचा अचूक वेध घेतला. अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे कंबरडे मोडले. या युद्धात भारताची विमानं पाडल्याचा दावा पाकने केले होता. भारताकडून याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले ट्रम्प?

5 विमानं पाडली

दोन्ही देशात परिस्थिती अत्यंत गंभीर होती. दोन्ही देशांकडे अणूशक्ती आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात हल्ले करत होते. एकमेकांची विमानं ते लक्ष्य करत होती. मला वाटतं 5 विमानं पाडण्यात आली. असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आता ही विमान कोणत्या देशाची पाडली हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या दाव्याने वादाला तोंड फुटले आहे.

दोन्ही देशात शांततेचे घेतले क्रेडिट

डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे 2025 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता करार झाल्याचे त्यांच्या एक्स हँडलवरून जाहीर केले होते. त्याचदिवशी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. आपण व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी तर युएई आणि अरब देशांच्या मध्यस्थीने तणाव निवाळल्याचे म्हटले होते. पण आता ट्रम्प यांनी पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आपल्याचमुळे निवळल्याचा दावा केला आहे.

आम्ही जगात सुरू असलेली अनेक युद्ध थांबवली. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत जात होता. तो दोनच दिवसात वाढला होता. आम्ही हा तणाव व्यापाराद्वारे थांबवला. जर तुम्ही लष्करी सामग्री, शस्त्रांचा अथवा अणू अस्त्रांचा वापर करणार असाल तर आम्ही तुमच्याशी व्यापारी करार करणार नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. इराण अणू शक्ती कार्यक्रम नष्ट करण्यातही अमेरिकेने मोठी भूमिका निभावल्याचे ते म्हणाले.