AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, DGMO पत्रकार परिषदेत मोठी माहिती समोर

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. भारताचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, DGMO पत्रकार परिषदेत मोठी माहिती समोर
DGMOImage Credit source: Social Media
| Updated on: May 11, 2025 | 7:15 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा युद्धविराम करारावर सहमती झाली आहे. या कराराचा पुढाकार पाकिस्तानकडून घेण्यात आला, ज्याला भारताने आपल्या अटींसह स्वीकारले. हा करार दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) स्तरावर झाला. भारतीय DGMO आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

पाकिस्तानात 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त

भारताचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, आम्ही अनेक दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवली होती. मात्र, भीतीमुळे अनेक दहशतवादी ठिकाणे रिकामी झाली होती. भारताने अत्यंत विचारपूर्वक लक्ष्य निश्चित केले होते. लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. लष्कराने पाकिस्तानात 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यांनी सांगितले की, 100 हून अधिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आम्ही तीन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये मुदस्सर खास, हाफिज जमील आणि यूसुफ अजहर यांचा समावेश आहे. या दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला आणि आयसी814चे अपहरण केले होते. वाचा: दर गुरुवारी हाफिज सईद कोणते काम करतो? माजी शागिर्दाने केला खुलासा

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी असीम मुनीर यांच्याशी केली चर्चा

सूत्रांनुसार, 7 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या DGMO ला कळवले होते की, त्याने पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. परंतु पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 9 मे रोजी भारताने हवाई हल्ले केले आणि 10 मे च्या सकाळी गोळीबार केला. या घटनांनंतर अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली आणि नंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना फोन करून सांगितले की, पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप