AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर गुरुवारी हाफिज सईद कोणते काम करतो? माजी शागिर्दाने केला खुलासा

एक असा मुलगा, ज्याच्या आईची इच्छा होती की आपला मुलगा डॉक्टर व्हावा. पण नशिबाने त्याला त्या मार्गावर नेले, जिथून परतणे सोपे नव्हते. लष्कर-ए-तैयबा (LeT) मध्ये सामील होणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप ठरला. आता तोच मुलगा, जो आता दहशतवादाच्या जगातून बाहेर पडला आहे, हाफिज सईदबद्दल धक्कादायक खुलासा.

दर गुरुवारी हाफिज सईद कोणते काम करतो? माजी शागिर्दाने केला खुलासा
Haseed SaiyadImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 10, 2025 | 1:44 PM
Share

भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा मुख्यालय असलेला मुरिदके याचाही समावेश होता, ज्याचा म्होरक्या आहे हाफिज सईद. तोच सईद, जो भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड राहिला आहे. आता त्याच्याच एका माजी शिष्याने त्याच्या भयंकर नेटवर्क उघडण्यास सुरुवात केली आहे.

हाफिस सईद विषयीचे खुलासे नूर दहरी याने केले आहेत. तो एकेकाळी लष्करचा भाग होता पण आता दहशतवादाच्या जगातून बाहेर पडला आहे. नूर सध्या ब्रिटनमधील इस्लामिक थिऑलॉजी ऑफ काउंटर टेररिझम या थिंक टँकचा डायरेक्टर आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये त्याने हाफिज सईद आणि लष्करशी संबंधित अनेक खळबळजनक दावे केले आहेत. वाचा: तुर्कीला शस्त्रांपेक्षा कुत्र्यांची सर्वाधिक भीती, टेन्शन इतकं की बलाढ्य देशाने घेतला हा निर्णय…

हाफिज सईदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी नूर तैनात होता

नूरने सांगितले की, लष्करमध्ये असताना त्याला मुरिदके येथील हाफिज सईदच्या कायमस्वरूपी ठिकाणाच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती. हीच ती जागा होती, जी LeT चे मुख्यालय होती आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा एक लक्ष्य होती. नूरच्या म्हणण्यानुसार, सईद एका निळ्या टोयोटा वीगो पिकअप (डॅटसन) मध्ये प्रवास करायचा, ज्याला त्याच्या सोयीनुसार खास तयार करण्यात आले होते.

दर गुरुवारी पाठवले जायचे 500 तरुण

नूर दहरी याचा सर्वात धक्कादायक दावा हा आहे की, दर गुरुवारी पाकिस्तानच्या विविध भागांतून सुमारे 500 तरुणांना अफगानिस्तानच्या कुनार प्रांतातील ‘मास्कर तैयबा’ प्रशिक्षण शिबिरात पाठवले जायचे. हे सर्व तरुण हाफिज सईदच्या भडकाऊ भाषणांमुळे प्रेरित होऊन लष्कर-ए-तैयबाशी जोडले जायचे. नूरने सांगितले की, यापैकी बहुतांश मुलं कधीच परत आली नाहीत.

अफगानिस्तान आणि काश्मीरमधील अनुभवांनी नूरला आतून तोडले. जेव्हा त्याने संघटना सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा लष्करच्या कमांडरांनी त्याला भित्रा म्हटले. पण नूर म्हणतो, मी भित्रा नव्हतो, फक्त सत्याने जागा झालो होतो.

10 लाख दहशतवाद्यांचे नेटवर्क आणि राखेची लढाई

नूरच्या म्हणण्यानुसार, आज लष्कर-ए-तैयबाकडे सुमारे 10 लाख प्रशिक्षित दहशतवादी आहेत आणि ही संघटना आता पाकिस्तानात राजकीय शक्तीप्रमाणे कार्य करते. त्याने आरोप केला की, हाफिज सईदने हजारो पाकिस्तानी नागरिकांना राखेच्या लढाईत झोकून दिले, जेणेकरून राज्याचे राजकीय उद्दिष्टे साध्य करता येतील. पोस्टच्या शेवटी नूरने लिहिले, मला आनंद आहे की आज मी तिथे नाही, जिथे हाफिज सईद मला पाहायचा होता. अल्लाहने मला निवडले आहे की मी या इस्लामी कट्टरपंथींचा खरा चेहरा जगासमोर आणावा.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.