AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी ताकद पाहून कागिसो रबाडा आश्चर्यचकीत, स्पष्टच म्हणाला की…

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा डंका वाजला आहे. त्याने आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला आहे. असं असताना वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे.

वैभव सूर्यवंशी ताकद पाहून कागिसो रबाडा आश्चर्यचकीत, स्पष्टच म्हणाला की...
वैभव सूर्यवंशी ताकद पाहून कागिसो रबाडा आश्चर्यचकीत, स्पष्टच म्हणाला की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 13, 2026 | 8:09 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 15 वर्षांचा असून दिग्गज गोलंदाजांचा त्याने प्रभावीपणे सामना केला आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार मारणार असं त्याने बोलून दाखवलं होतं. त्याने ते करूनही दाखवलं. जसप्रीत बुमराहच काय तर इतर गोलंदाजांनाही त्याने दिवसा तारे दाखवले आहेत. त्यामुळे त्याची विकेट मिळाल्यावर गोलंदाजांचा जल्लोष काही भलताच असतो. इतकी दहशत त्याची गोलंदाजांच्या मनात आहे. असं असताना त्याच्या आक्रमक फलंदाजीचं कागिसो रबाडाने कौतुक केलं आहे. वैभव सूर्यवंशीने कागिसो रबाडाच्या षटकात दोन उत्तुंग षटकार मारले होते. त्यानंतर कागिसो रबाडा त्याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडला आहे. त्याची बॅट स्विंग पाहून खूश झाल्याचं रबाडाने सांगितलं. इतकंच काय तर वैभवच्या मनात कुठेच भीती दिसत नाही, असंही त्याने सांगितलं.

कागिसो रबाडाने सांगितलं की, ‘वैभव सूर्यवंशीमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. त्याचा हात वेगाने चालतो. त्याच्या मनात कुठेच भीती दिसत नाही. जेव्ही तुम्ही तरूण असता तेव्हा असं असतं.’ वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना रबाडाने पुढे सांगितलं की, ‘सूर्यवंशीला असं करताना पाहून आश्चर्य वाटतं. मला वाटतं की, क्रिकेटच्या खेळात खासकरून आयपीएलमध्ये असं पाहणं चांगली गोष्ट आहे. त्याला पाहून खूप चांगलं वाटतं की क्रिकेट हा खेळ हा रोमांचक आहे.’ वैभव सूर्यवंशीने 11 डावात 440 धावा केल्या आहेत. त्याने 40 च्या सरासरीने आणि 236 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 9 मे रोजी सामना झाला होता. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा सामना कागिसो रबाडाशी झाला होता. तेव्हा वैभवने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारले होते. वैभव सूर्यवंशीने 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 13 चेंडूत 36 केल्या होत्या. पण त्याची खेळी कामी आली नाही. गुजरात टायटन्सने विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं होतं. पण राजस्थानचा संघ फक्त 152 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?