AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: सरकार लढायला तयार नव्हते, अवघ्या 30 मिनिटात सरेंडर केलं, राहुल गांधींचा आरोप

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. भारत सरकारने अवघ्या 30 मिनिटात माघार घेतली. याबाबत खुद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माहिती दिली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Operation Sindoor: सरकार लढायला तयार नव्हते, अवघ्या 30 मिनिटात सरेंडर केलं, राहुल गांधींचा आरोप
Rahul Gandhi
| Updated on: Jul 29, 2025 | 5:47 PM
Share

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी बोलताना लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. भारत सरकारने अवघ्या 30 मिनिटात माघार घेतली. याबाबत खुद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माहिती दिली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपले भाषण सुरु करताना राहुल गांधी म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्यानंतर या हाऊसमधील प्रत्येक व्यक्तीने पाकिस्तानचा निषेध नोंदवला. या घटनेनंतर आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलो. काही सीनियर नेत्यांनी आतातायी विधाने केल्याचं ऐकलं. आपण सर्व एकसंघपणे उभे राहिलो, याचा आम्हाला विरोधक म्हणून अभिमान आहे. जे झालं ते चुकीचं झालं. प्रत्येकाने निषेध नोंदवला.

अध्यक्ष महोदय, राजकीय काम करताना आपण संपूर्ण देशात जातो. लोकांना भेटतो. सैन्याच्या कुटुंबातील कुणाच्याही घरी जातो, जेव्हा त्यांच्या हातात हात मिळवतो, तेव्हा भारतीय सैन्याचा माणूस असल्याचं कळतं. हात मिळवताच कळतं हा टायगर आहे. त्याला हलवलं जाऊ शकत नाही. त्यांना कुठेही पाठवा तो देशासाठी लढायला, मरायला तयार असतो. टागरला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागतं. टागरला तुम्ही बांधू शकत नाही. टायगरकडून पूर्ण काम घ्यायचं असेल तर त्याला सूट द्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘काल राजनाथ सिंह यांचं भाषण ऐकत होतो. राजनाथ म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे पहाटे 1 वाजता सुरू झालं. नंतर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर 22 मिनिटे चालले. नंतर म्हणाले, 1.30 वाजता आम्ही पाकिस्तानला फोन केला. आणि सांगितलं आम्ही नॉन मिलिट्री टार्गेटवर हल्ला केला. आम्हाला डिस्क्लेशन नाही पाहिजे. हे त्यांचे शब्द होते. भारताच्या डीजीएमओने सांगितलं, की सीजफायर करा.

रात्री 1.30 वाजता. तुम्ही पाकिस्तानला काय सांगितलं. तुम्ही सांगितलं आम्ही मिलिट्री टार्गेट केलं नाही. दोन लोकांमध्ये भांडण होतं. एक दुसऱ्याला ठोसा मारला, आणि म्हणतो आम्हाला लढायचं नाही. म्हणजे पाकिस्तानला तुम्ही सांगितलं की आमची लढायची इच्छा नाही. म्हणजे तुम्हाला पाकिस्तानशी युद्ध करायचं नव्हतं. आम्हाला लढाई करायची नाही. आमची लढायची इच्छा नाही. हे तुम्ही सांगितलं. तुम्ही अवघ्या 30 मिनिटात सरेंडर झाला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.