AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 5 वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला बेपत्ता, NCRB च्या डेटामधून धक्कादायक खुलासा

2020 मध्ये 8,290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. आत्तापर्यंत एकूण बेपत्ता महिलांची संख्या 41,621 इतकी आहे.

गेल्या 5 वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला बेपत्ता, NCRB च्या डेटामधून धक्कादायक खुलासा
Image Credit source: social media
| Updated on: May 09, 2023 | 11:04 AM
Share

अहमदाबाद : गुजरातमध्ये (Gujarat) गेल्य़ा पाच वर्षांचा 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता (40k women missing) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये पाच वर्षांच्या कालावधीत 40,000 हून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 7,105, 2017 मध्ये 7,712, 2018 मध्ये 9,246 आणि 2019 मध्ये 9,268 महिला बेपत्ता झाल्या. तर 2020 मध्ये 8,290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. आत्तापर्यंत एकूण बेपत्ता महिलांची संख्या 41,621 इतकी आहे.

योगायोगाने, 2021 मध्ये विधानसभेत राज्य सरकारने केलेल्या निवेदनानुसार, अहमदाबाद आणि वडोदरा येथे अवघ्या एका वर्षात (2019-20) 4,722 महिला बेपत्ता झाल्या.

यासंदर्भात माजी आयपीएस अधिकारी आणि गुजरात राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सुधीर सिन्हा म्हणाले, ” बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये, मी असं पाहिलं आहे की, त्या मुली आणि महिलांना अधूनमधून गुजरात व्यतिरिक्त इतर राज्यात पाठवले जाते आणि त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते.”

“पोलिस यंत्रणेची समस्या अशी आहे की ती हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत नाही. अशी प्रकरणे खुनापेक्षाही गंभीर असतात. कारण जेव्हा एखादे मूल बेपत्ता होते, तेव्हा पालक आपल्या मुलाची वर्षानुवर्षे वाट पाहत असतात. हरवलेल्या व्यक्तींचा तपास हा खुनाच्या प्रकरणाप्रमाणेच कठोरपणे व्हायला हवा,” असेही ते पुढे म्हणाले. बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणांचा तपास ब्रिटीशकालीन पद्धतीने होत असल्याने पोलिसांकडून वारंवार दुर्लक्ष केले जाते, असेही सिन्हा यांनी नमूद केले.

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. राजन प्रियदर्शी म्हणाले की, मुली बेपत्ता होण्यासाठी मानवी तस्करी जबाबदार आहे. “बहुसंख्य हरवलेल्या महिलांना अवैध मानवी तस्करी करणारे गट उचलतात जे त्यांची दुसऱ्या राज्यात नेऊन त्यांची विक्री करतात, असे निरीक्षण मी माझ्या कार्यकाळात केले ” असे त्यांनी सांगितले.

“जेव्हा मी खेडा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक (एसपी) होतो, तेव्हा उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने जिल्ह्य़ात मजूर म्हणून काम करत असलेल्या एका गरीब मुलीला उचलून त्याच्या राज्यात विकले, तिथे तिला शेतमजूर म्हणून कामावर ठेवण्यात आले. सुदैवाने आम्ही तिची सुटका करण्यात यशस्वी झालो, परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये असे घडत नाही,” असेही डॉ. राजन यांनी नमूद केले.

“भाजप नेते केरळमधील महिलांबद्दल बोलतात पण देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये 40,000 हून अधिक महिला बेपत्ता आहेत. त्याबद्दल कोण बोलतंय? ” असा प्रश्न गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते हिरेन बनकर यांनी उपस्थित केला.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.