अंबानींच्या एका तासाची कमाई करण्यासाठी तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील : रिपोर्ट

Oxfam Report | रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी यांनी एका तासात जेवढे कमावले, तेवढे कमवायला कमवायला तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील

अंबानींच्या एका तासाची कमाई करण्यासाठी तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील : रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 2:46 PM

मुंबई : कोरोना काळात रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी (Reliance Mukesh Ambani)  यांनी एका तासात जेवढे कमावले, तेवढे कमवायला कमवायला तुम्हा-आम्हाला तब्बल 10 हजार वर्ष लागतील. गरिबी निवारणाचा सर्व्हे करणाऱ्या ऑक्सफॅम या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षण अहवालात ही गोष्ट मांडण्यात आली आहे. कोरोनाकाळात भारतातील 100 उद्योजकांनी जेवढी संपत्ती कमावली आहे, ती डोकं चक्रावून सोडणारी आहे. कोरोना संकटात जेव्हा अनेकांजण रस्त्यावर आले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे उद्योग बंद पडले, मजुरांनी रणरणत्या उन्हात शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास केला. मात्र, त्याचवेळी देशातील बडे उद्योगपती आणि अब्जाधीश तासांत कोट्यवधींचा गल्ला जमवत होते. ऑक्सफेमने The Inequality Virus या नावाखाली हा सर्वे प्रकाशित केला आहे. ( Oxfam Report on Inequalities In India During Covid )

अब्जाधीशांच्या संपत्तीत 35 टक्के वाढ

कोरोना लॉकडाऊनच्या काळात भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत तब्बल 35 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. मार्च 2020 नंतरच्या काळात हा सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये 100 अब्जाधीशांच्या संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. या अब्जाधीशांच्या संपत्तीत कोरोना संकटात तब्बल 12. 97 ट्रिलियन म्हणजेच 12 लाख 97 हजार 822 कोटी रुपयांची वाढ झाली.

तर प्रत्येक गरीबाला मिळणार लाखभर रुपये!

कोरोना संकटात अब्जाधीशांच्या संपत्तीत जी वाढ झाली आहे, फक्त त्या वाढीचा पैसा देशातील गरिबांना वाटला तर प्रत्येकाला लाखभर रुपये मिळू शकतात. 12.97 कोटी ट्रिलियन हा आकडा किती मोठा आहे याचा अंदाज तुम्हाला यावरुन येऊ शकतो की, देशात 13.8 कोटी लोक दारिद्र रेषेखाली आहेत. त्यांना जर या पैशाचं वितरण केलं, तर प्रत्येकाच्या बँक खात्यात 94 हजार 45 रुपये जमा होतील.

( Oxfam Report on Inequalities In India During Covid )

अंबानींची तासातील कमाई मिळवायला दहा हजार वर्ष लागतील

कोरोना संकटात मुकेश अंबानींच्या संपत्तीत दर तासाला कोट्यवधींची वाढ होत होती. ही वाढ इतकी मोठी आहे, की अंबानींची एका तासातील कमाई साध्या एका मजुराला कमवायची म्हटली, तर त्याला तब्बल 10 हजार वर्ष लागू शकतात. या अहवालात प्रत्येक उद्योगपतीच्या तासातील कमाईचा उल्लेख आहे. गरिबी आणि श्रीमंतीतील ही दरी कोरोना संकटात आणखी खोल झाल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे.

काहींना तासांत कोटी, तर काही लाख जण तासात रस्त्यावर!

कोरोना संकटात जेव्हा कोट्यधीश आणखी श्रीमंत होत होते, त्याच काळात काही कोटी लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. याच सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2020 च्या महिन्यात दर तासाला 1 लाख 70 हजार लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. भारतातील कामगारांची परिस्थिती तर आणखी भयानक होती. भारतात 12 कोटी लोक असंघटीत क्षेत्रात काम करतात. त्यातील तब्बल 75 टक्क्याहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 4 ते 5 कोटी लोकांना रणरणत्या उन्हात, तापलेल्या रस्त्यांवर आपल्या मुलाबाळांसह शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

विषमतेचा विषाणू कोरोना (The Inequality Virus)

गरीब आणि श्रीमंत ही दरी कमी करण्याबद्दल राजकारण्यांपासून ते समाजकारणी आणि उद्योगपती नेहमी बोलतात. मात्र, कुठल्याही संकटाचा फटका हा नेहमी गरीब आणि मध्यम वर्गीयांनाच बसताना दिसतो. कुठल्याही संकटात श्रीमंतांचा फायदाच होताना दिसतो. कोरोना संकटात तो अधिक ठळकपणे जाणवत आहे. कारण, या काळात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरिबीच्या दरीत ढकलला गेल्याचं या अहवालात म्हटलं आहे. म्हणूनच या अहवालात कोरोनाला विषमतेचा विषाणू म्हटलं गेलं आहे.

श्रीमंतांची संपत्ती वाढण्याच्या बाबतीत भारत सहावा

जगभरात कोरोना संकटात अब्जाधीश आणखी श्रीमंत झाल्याचं चित्र दिसलं. यामध्ये सर्वात पुढे आहे अमेरिका. इथल्या उद्योगपतींची संपत्ती वायूवेगानं वाढल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यानंतर चीन, जर्मनी, रशिया आणि फ्रान्सचा नंबर लागतो. त्यानंतर भारतातील उद्योगपती सर्वात श्रीमंत ठरल्याचं दिसतं.

भारतातच नाही, जगभरातील अब्जाधीश फायद्यात

भारतातीलच नाही, तर कोरोना संकटात जगभरातील अब्जाधीश फायद्यातच राहिल्याचं चित्र दिसलं. अॅलन मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 70 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली. कोरोना संकटाच्या आधी ते श्रीमंतांच्या यादीत खालच्या स्थानी होते. मात्र, कोरोना संकटात त्यांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाली. कोरोना संकटानंतर अॅलन मस्क यांनी अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांनाही मागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला.

संबंधित बातम्या:

मजूराला मिळालं एवढं सोनं की अख्खं गाव झालं श्रीमंत, या शहराचं नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

‘हे’ एक नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोट्यधीश होणार

America: नशीब असावं तर असं, सहा आकड्यांनी बदलला खेळ, एका रात्रीत अब्जाधीश

( Oxfam Report on Inequalities In India During Covid )

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....