AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलं, नातवंडं भारतीय, ‘ती’ मात्र पाकिस्तानी, देश सोडण्यावरून शारदबाईंची पंचाईत; नेमकं काय घडलं?

या निर्णयानंतर भारतात वर्षानुवर्षे राहणाऱ्या काही लोकांची पंचाईत झाली आहे. यात भूवनेश्वर येथील शारदा उर्फ शारदा कुकरेजा यांचाही समावेश आहे.

मुलं, नातवंडं भारतीय, 'ती' मात्र पाकिस्तानी, देश सोडण्यावरून शारदबाईंची पंचाईत; नेमकं काय घडलं?
pakistani woman ordered to leave india
| Updated on: Apr 27, 2025 | 12:56 PM
Share

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्ण घेतले आहेत. भारताने व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्यास सांगितलं आहे. तर पाकिस्तानी नागरिकांनाही भारतीय नागरिकांना त्यांचा देश सोडून जाण्यास सांगितलं आहे. दरम्यान या निर्णयानंतर भारतात वर्षानुवर्षे राहणाऱ्या काही लोकांची पंचाईत झाली आहे. यात भूवनेश्वर येथील शारदा उर्फ शारदा कुकरेजा यांचाही समावेश आहे.

लग्न झालं, 30 वर्षांपासून भारतात पण..

शारदा कुकरेजा या मूळच्या पाकिस्तानी नागरिक आहेत. मात्र गेल्या 30 वर्षांपासून त्या भारतात राहतात. साधारण 30 वर्षांपूर्वी त्यांचे एका भारतीय उद्योजकाशी लग्न झाले होते. तेव्हापासून त्या भारतात राहतात. सध्या त्यांना दोन आपत्यं आहेत. त्यांना एक नातू आणि एक नातदेखील आहे. पण अजूनही त्यांना भारतीय नागरिकता मिळू शकलेली नाही. भारताचे नागरिकत्त्व मिळावे म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलं आणि नातवंडांना भारतीय नागरिकता मिळालेली आहे.

…तर तुमच्यावर कारवाई होणार

शारदा यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पण व्हिसा नाही. गेल्या तीस वर्षांपासून त्या भारतात राहात असल्या तरी भारतीय नागरिकत्त्व नसल्यामुळे त्यांना देश सोडून जाण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच मुदत दिलेल्या तारखेच्या आत देश सोडून न गेल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही या नोटिशीत म्हणण्यात आलंय.

वडील 60 दिवसांसाठी आले अन्…

शारदा यांचे पूर्ण कुटुंब सध्या भारतात आहे. माझे पाकिस्तानमध्ये कोणीही ओळखीचे नाही, असा त्यांचा दावा आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या रिपोर्टनुसार शारदाबाई यांचा जन्म 1970 साली पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुक्कूर शहरात झाला. त्यांचे वडील 1987 साली लाँग टर्म व्हिसावर आपल्या सहा मुलांना घेऊन भारतात 60 दिवसांसाठी आले होते. नंतर ते ओडिसातील कोरापुट जिल्ह्यात स्थायिक झाले. शारदा यांचे लग्न बोलनगीर येथील एका उद्योजकाशी झाले. त्यांना एक मुलगा एक मुलगी आणि नातू-नात आहेत. हे सर्व भारतीय नागरिक आहेत. पण शारदाबाई यांना भारतीय नागरिकत्त्व मिळालेलं नाही.

शारदाबाई यांचे नेमके काय होणार?

दरम्यान, तुमच्याकडे लाँग टर्म व्हिसा नाही. तसेच भारतात राहू देण्यासाठी तुम्ही ‘अपवाद’ या श्रेणीतही येत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर देश सोडावा अशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे. शारदाबाई यांना मात्र भारत सोडून पाकिस्तानात जायचे नाही. मी जेव्हापासून भारतात आले तेव्हापासून मी या देशाला माझं मानलं आहे. मी अजून पाकिस्तानात कोणाशी बोललेलीही नाही, असं त्या सांगतात. दरम्यान, ओडिसा राज्यातून एकूण 12 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शारदाबाई यांचे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप