AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kashmir Pahalgam Terror Attack : दहशतवादाविरोधात अमेरिका भारतसोबत, पहलगाम हल्ल्यानंतर ट्रम्पही भडकले, पंतप्रधान मोदींशी केली बातचीत

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्याशीही बोलणं झालं. दहशतावादविरोधातील लढाईत अमेरिका हा भारतासोबत असल्याची ग्वाही ट्रंप यांनी मोदींना दिली. त्यांनी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त केला.

Kashmir Pahalgam Terror Attack : दहशतवादाविरोधात अमेरिका भारतसोबत, पहलगाम हल्ल्यानंतर ट्रम्पही भडकले, पंतप्रधान मोदींशी केली बातचीत
नरेंद्र मोदी- डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोनवरून चर्चाImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 23, 2025 | 7:53 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतावदी हल्ल्यामुळे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरलं आहे. या हल्लाय दहशतवाद्यांनी अनेक निरपराध पर्यटकांची निर्घृण हत्या केली असून अनेक जण यांत गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर, भारताने कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे. या हल्ल्याची माहिती मिळल्यानंतर गृहमंत्री अमित शहा तत्काश काश्मीरमध्ये पोहोचले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त केला. ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे ट्रंप यांनी मोदींना सांगितल्याचे समजते.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. या भ्याड आणि घृणास्पद दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि समर्थकांना शिक्षा होईल अशीग्वाही त्यांनी दिली.

ट्रंप यांच्यासोबतचा कॉल एवढा महत्वाचा का ?

हा कॉल भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण अमेरिकेची सहानुभूती आणि पाठिंबा यामुळे भारताला दहशतवादाविरुद्ध मजबूत राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. भारत-अमेरिकेतील संबंधांमधील वाढती धोरणात्मक भागीदारी लक्षात घेता, ही चर्चा दोन्ही देशांसाठी अधिक महत्त्वाची ठरली आहे. भारताविरुद्धच्या या दहशतवादी हल्ल्याचा ट्रम्प यांनी केलेला निषेध भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाविरुद्ध जोरदार आवाज उठवण्याची संधी देईल.

इस्रायल आणि पुतिनही सोबतीला

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून हा अतिशय अमानवी गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केलं. दहशतवादाविरुद्ध भारताशी सहकार्य मजबूत करण्याचे आश्वासन दिले. इस्रायलनेही या हल्ल्याचा निषेध केला, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली. तसेच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादाविरुद्ध भारताला जागतिक पाठिंबा मिळताना दिसत आहे.

हल्ल्यानंतर सेना अलर्ट

पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने सुरक्षा दलांना घटनास्थळी अधिक सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आणि भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर संयुक्त कारवाई सुरू केली. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडता यावे आणि परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ही कारवाई सुरक्षा दलांची सर्वोच्च प्राथमिकता बनली आहे.

सौदीचा दौरा सोडून मोदी दिल्लीत दाखल

या हल्ल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दोन दिवसांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सौदी अरेबियाने आयोजित केलेला अधिकृत डिनर वगळला आणि त्यांचा दौरा अर्धवट थांबवून देशात परतण्याचा निर्णय घेतला. आज पहाटे ते भारतात दाखल झाले. तत्पूर्वी, मोदींनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्या लोकांनी त्यांचे प्रिय नातेवाईक, कुटुंबीय गमावले, त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरं वाटावं अशी माझी प्रार्थना आहे, असेही त्यांनी नमूद केलं.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.