Explained : PM मोदींचे 5 संकल्प, पाकिस्तानच काही खरं नाही
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात एकाबाजूला प्रचंड संताप आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला भारत काय कारवाई करणार ही पाकिस्तानला भिती आहे. या दरम्यान भारतात काल दोन महत्त्वाच्या हाय लेव्हल बैठका पार पडल्या. या बैठकीत काही गोष्टी ठरल्या. त्यामुळे पाकिस्तान फुल टेन्शनमध्ये आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्यप्रमुख आणि CDS अनिल चौहान उपस्थित होते. या बैठकीत पीएम मोदी यांनी दहशतवादी आणि त्यांच्या हँडलर्स विरोधात कठोर कारवाई करण्याची सैन्याला पूर्ण मोकळीक दिली. सैन्याला त्यांच्या हिशोबाने ऑपरेशन करण्याची मोकळीक आहे, असं पीएम मोदी यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदींची कठोर भूमिका आणि सुरक्षा एजन्सीच्या सातत्याने सुरु असलेल्या बैठका यावरुन भारत आता कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पहलगामच्या घटनेने सगळ्या देशाला हादरवून सोडलय. पाकिस्तानला काय प्रत्युत्तर देणार याची देशवासियांना प्रतिक्षा आहे. भारताची संभाव्य सैन्य कारवाई आणि रणनितीक निर्णयांबद्दल या बैठकीत विस्ताराने चर्चा झाल्याची शक्यता आहे. 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे सगळ्या देशात संतप्त वातावरण आहे.
सैन्याला मोकळीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तिन्ही सैन्य दलांना कारवाई करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. आता सुरक्षा पथकं ठरवणार कुठे, कधी आणि कशी कारवाई करायची.
ऑपरेशनची वेळ सैन्य ठरवणार : बैठकीत हे स्पष्ट करण्यात आलं, ऑपरेशनचा निर्णय सैन्याला घ्यायचा आहे. याचा अर्थ असा आहे की, भारताची प्रत्युत्तराची कारवाई कशी असेल? त्यासाठी कुठली वेळ उत्तम असेल? हे सैन्य ठरवेल.
टार्गेट सैन्य ठरवणार : पीएम मोदी यांनी तिन्ही सैन्य प्रमुखांच्या बैठकीत हे स्पष्ट केलं की, बदला घेण्यासाठी कशा प्रकारच टार्गेट ठरवायचं आहे, हे सेना ठरवेल. टार्गेटमध्ये कोण असेल? हे सुद्धा सैन्यच ठरवेल.
दहशतवादाला उत्तर हा राष्ट्रीय संकल्प : पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या हाय लेव्हल मीटिंगमध्ये दहशतवादाला प्रत्युत्तर देणं हा दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. त्यांना सैन्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.
दहशतवाद संपवून राहणार : बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. आम्ही दहशतवाद संपवून राहणार. मला सैन्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे असं पीएम मोदी म्हणाले.
कधीही होऊ शकते Action
पंतप्रधान मोदींनी सैन्याला मोकळीक दिल्यानंतर भारत कधीही आणि कुठल्याही वेळी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करु शकतो अशी चर्चा सुरु झालीय. दहशतवादी आणि त्यांच्या हँडलर्स विरुद्ध कशा प्रकारची कारवाई होईल? या बद्दल कुठलाही अंदाज लावणं घाईच ठरेल. कारण सैन्याकडून सिक्रेट ऑपरेशन्स केले जातात. एक निश्चित आहे, 26 निरपराधांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल.
LOC वर सैन्य तैनाती सुद्धा वाढवली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रारंभी उचलेली पावलं आणि संकल्प यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पीएम मोदी यांनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्याने तिथले सत्ताधारी टेन्शनमध्ये आहेत. पाकिस्तानी सैन्य हाय अलर्टवर आहे. भारत प्रत्युत्तराची कारवाई कशी करेल ही भिती त्यांच्या मनात आहे. पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईच्या भितीने आपल्या कुटुंबांना परदेशात पाठवलं आहे. पाकिस्तानने LOC वर सैन्य तैनाती सुद्धा वाढवली आहे.
दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळाले
26 पर्यटकांची हत्या करुन दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळाले. या घटनेनंतर सुरक्षा टीम्सकडून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सर्च ऑपरेशन्स सुरु आहेत. हा हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.
