‘बॉम्ब लावला आणि क्षणात सर्वकाही…’, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याच्या बहिणीचं धक्कादायक वक्तव्य
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्धवस्त केली आहेत. याच दरम्यान दहशदवादी आदिल हुसैन याच्या बहिणीने धक्कादायक खुलासा केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे...

Pahalgam Terror Attack: पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाची मोहिम सुरू आहे. पहलगाममध्ये दहशतवादी कारवायात सहभागी दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्धवस्त केली आहेत. बिजबेहरा दहशदवादी आदिल हुसैनचं घर आयईडीने उद्ध्वस्त केलं आहे. तर आसिफ शेख याचं घर बुलडोजरने उद्ध्वस्त केलं आहे.
दहशदवाद्याचं घर उद्ध्वस्त केल्यानंतर आसिफ शेखच्या बहिणीने मोठा खुलासा केला आहे. ‘माझा एक भाऊ तुरुंहात आहे तर दुसरा मुजाहिदीन आहे. गेल्या दोन दिवसांपासून माझ्या कुटुंबियांनी पोलीस घेवून जात आहे आणि मला याची कल्पना देखील नाही. कारण मी सासरी असते.’
#WATCH | Tral, J&K | Visuals of a destroyed house that is allegedly linked to a terrorist involved in the Pahalgam terror attack pic.twitter.com/luIH9rQIKR
— ANI (@ANI) April 25, 2025
‘मी घरी पोहोचली तेव्हा घरी कोणीच नव्हतं. माझी आई आणि माझ्या दोन बहिणींना पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं आहे. मी जेव्हा घरी आली तेव्हा सुरक्षा दल लोक माझ्या घरी आले आणि आम्हाला त्यांनी घरातून बाहेर काढलं. मी पाहिलं एक व्यक्ती घरातील स्टोरमध्ये काही बॅम्ब सारखं लावत होता. मी स्वतः ते सर्व पाहिलं आहे. त्याने लष्करी वर्दी दखील घातली होती. त्यांनी बॉम्ब फोडला आणि आमचं घर उद्ध्वस्त झालं. असं दहशदवाद्याची बहीण म्हणाली आहे.
#WATCH | Tral, J&K | “My brother is a Mujahideen,” says the sister of a terrorist allegedly involved in Pahalgam attack whose house in Tral was demolished
“…My one brother is in jail, the other brother is a ‘Mujahideen’, and I also have two sisters. Yesterday, when I came here… pic.twitter.com/4sMr6GM1V4
— ANI (@ANI) April 25, 2025
आदिल हुसान गेला होता पाकिस्तानात
आदिल हुसान याने पाकिस्तान दहशदवाद्यांसोबत बैसरन घाट याठिकाणी हल्ल्याकरण्याच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आदिल हुसेन 2018 मध्ये पंजाबमधील अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात प्रवेश केला होता आणि गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यापूर्वी तेथील दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतलं.
