AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terrorist Attack : सर्जिकल स्ट्राईक नाही, इतकंच करा की, पाकिस्तान लोटांगण घेईल, खान सरांचा तो खास प्लॅन!

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानला गुडघ्यावर टेकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जनतेत संताप आहे. खान सरांनी तर एक जबरदस्त प्लॅन सांगितला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या जातील.

Pahalgam Terrorist Attack : सर्जिकल स्ट्राईक नाही, इतकंच करा की, पाकिस्तान लोटांगण घेईल, खान सरांचा तो खास प्लॅन!
खान सरांचा तो व्हिडिओ व्हायरलImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 26, 2025 | 2:03 PM
Share

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारताने कायदेशीर स्ट्राईक केली आहे. सिंधू पाणी करार रद्द केला आहे. तर समाज माध्यमांवर लोकप्रिय असलेले शिक्षक, खान सरांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्यासाठी एक जबरदस्त योजना सांगितला आहे. सिंधू पाणी करार तोडणे अथवा सर्जिकल स्ट्राईक हा उपाय नाही. पण या एका उपायाने पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी जाईल असा दावा खान सरांनी केला आहे.

हा प्रभावी उपाय नाही

खान सरांचे युट्यूब चॅनल हा अनेकांसाठी ज्ञानाचा स्त्रोत आहे. या चॅनलवर खान सरांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक खास योजना सांगितली आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. खान सरांनी सिंधू पाणी करार रद्द करणे अथवा सर्जिकल स्ट्राईक हे प्रभावी उपाय नसल्याचे म्हटले आहे. पाणी वळवून आपण कुठे आणणार, असा सवाल खान सरांनी केला आहे.

खान सरांच्या मते सध्या सिंधू नदी पात्रात बांध घाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह बंद होईल. पाकिस्तानच्या भागातील लोक पाण्यासाठी वणवण भटकतील. कडक उन्हाळ्यात त्यांना धडा बसेल. जेव्हा हा बांध पूर्णपणे पाण्याने भरेल. तेव्हा तो अचानक सोडून द्या. त्यामुळे पाकिस्तानाला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळेल.

खान सरांचा तो उपाय काय?

हिंदी महासागरात भारताचा धाक आहे. हा धाक भारताने अजून वाढवावा. इराणच्या चाबहार बंदरापर्यंत भारताने गस्त वाढवावी. भारतीय युद्ध नोका तिथपर्यंत घेऊन जाव्यात. पाकिस्तानची समुद्रात कोंडी करावी. समुद्रामार्गे पाकिस्तानचा जो व्यापार होतो. तो पूर्णपणे बंद करावा. एकीकडे सिंधू नदीचे पाणी थांबवणे आणि दुसरीकडे नेव्हल ब्लॉकेज करुन पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळ करणे हा मोठा प्रभावी उपाय असल्याचे खान सरांचे मत आहे.

खान सरांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांना खान सरांची ही योजना आवडली आहे. अनेकांनी पाकिस्तानची सर्व प्रकारची नाकाबंदी करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानला पुढील अनेक वर्षे धडा बसेल असे उपाय करणे आवश्यक असल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया, कमेंट या व्हिडिओवर येत आहे. आर्थिक रसद तोडली तर पाकिस्तान बेचिराख होईल असे लोकांचे म्हणणे आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.