
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 5 बैठका घेतल्या. त्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या (NSAB) सदस्यांमध्ये बदल केल्याचे समोर आले. आता या मंडळात 7 दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. हे महारथी पाकिस्तानच्या विनाशाची कहाणी लिहितील असे सांगण्यात येते. यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे दिग्गजांचा समावेश आहे.
कोण आहेत ते दिग्गज
1. आर. आलोक जोशी
माजी IPS अधिकारी आर.आलोक जोशी हे 2012 ते 2014 पर्यंत भारतीय हेर संघटना रिसर्च अँड एनालिसिस विंगचे (RAW) प्रमुख होते. पाकिस्तानची बारीक-सारीक माहिती त्यांना आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI ची कुंडली त्यांच्या हाती आहे.
2. डी. बी. वेंकटेश वर्मा
माजी IFS अधिकारी डी. बी. वेंकटेश वर्मा 2019 ते 2021 पर्यंत रशियातील राजदूत होते. त्यांनी यापूर्वी जिनेव्हा आणि स्पेनमध्ये पण काम केले आहे. पाकिस्तानविरोधात रणनीती तयार करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. दक्षिण आशियातील सुरक्षा आणि अणवस्त्र या विषयात त्यांचा सखोल अभ्यास आहे.
3. एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा
वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे वायुसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख होते. त्यांना 4500 तासांपेक्षा अधिक विमान उडवण्याचा अनुभव आहे. ते एक अनुभवी लढाऊ वैमानिक आहेत.
4. लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह
भारतीय लष्काराचे माजी अधिकारी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह हे दक्षिण कमांडचे ऑफिसर कमांडिंग प्रमुख होते. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर सुरक्षा आणि लष्करी रणनीती आखण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. जम्मू-काश्मीर आणि संवदेनशील भागावर त्यांची नजर आहे.
5.रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना यांनी नौदलात अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे. ते नौदलाच्या युद्ध विद्यालयाचे कमांडेंट होते. अरबी सुमद्रात पाकिस्तानवर लक्ष्य ठेवण्याचे काम त्यांच्या काळात झाले.
6.राजीव रंजन वर्मा
राजीव रंजन वर्मा 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. वर्मा हे अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थाचे सखोल अभ्यासक मानल्या जातात. रेल्वे सुरक्षा दलाचे ते डीजी होते. त्यांना रेल्वेचे नेटवर्क माहिती आहे. त्यांना पाकिस्तानच्या अंतर्गत दळणवळण आणि रस्ते वाहतुकीचे जाळे माहिती आहेत.
7. मनमोहन सिंह
माजी IPS अधिकारी मनमोहन सिंह यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. त्यांनी अनेक राज्यातील सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे. NSAB मध्ये राष्ट्रीय सुरक्षा नीती, युद्ध धोरण आणि गुप्त वार्ता विषयात त्यांचा सखोल अभ्यास आहे.