Explained : दहशतवादाच्या सापाकडून फक्त अणूबॉम्बचा जप, LOC पासून इस्लामाबादपर्यंत नुसती ‘पळापळ’
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानात सध्या फक्त युद्धाची तयारी सुरु आहे. युद्धाच्या मोडमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या एक्सपर्टची हास्यास्पद वक्तव्य एकदा वाचा. भारताकडून हल्ला होईल या भितीने पाकिस्तान इतका हादरलाय की, मेडिकल इमरजन्सीसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पॅरामेडिकल स्टाफला 24 तास ड्यूटीवर तैनात रहाण्याचे आदेश दिले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्वप्रथम पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राइक केला. भारताने आतापर्यंत कूटनितीक Action घेतली आहे. अजून लष्करी कारवाई झालेली नाही. पुढच आक्रमण कधी होणार? याचं काऊंटडाऊन पाकिस्तानकडून सुरु आहे. पाकिस्तानात सध्या ज्या घडामोडी घडतायत, त्यावरुन ते बिथरल्याच स्पष्ट दिसून येतं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, त्यांचे मंत्री, सैन्य प्रमुख आसिम मुनीर, त्यांचे कर्नल, जनरल आणि टेररिस्तानमध्ये फक्त अणूबॉम्ब, अणूबॉम्बचा जप ऐकू येत आहे. तिथे कट्टरपंथी मौलाना सुद्धा अणूबॉम्बची धमकी देत आहेत. भारताचा पुढचा प्रहार कसा असेल? याच चिंतेमध्ये सध्या पाकिस्तान आहे. त्यामुळे त्यांच्या हातात आता फक्त अणूबॉम्ब बोलण्याशिवाय काहीही उरलेलं नाही. भिती, हताशा आणि गोंधळलेली मानसिकता यातून पाकिस्तानी सैन्याने सीजफायर मोडून आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. पीएम मोदी काल ‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याबद्दल बोलले. “मी पीडित कुटुंबाना विश्वास देतो, त्यांना न्याय मिळणार. या हल्ल्याचे दोषी आणि कारस्थान रचणाऱ्यांना कठोरातील कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
दहशतवादाचे जागतिक सप्लायर आणि पहलगामच कारस्थान रचणाऱ्या पाकिस्तानसाठी हा थेट इशारा मानला जातोय. मोदींच्या या शब्दांनी टेररिस्तानच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. इस्लामाबादमधून थेट या भयाच प्रसारण सुरु झालय. उद्या युद्ध झाल्यास पाकिस्तान किती दिवस टिकू शकतो? हा पाकिस्तानात चर्चेचा सर्वात मोठा मुद्दा आहे. “छोट्या युद्धात पाकिस्तान तरून जाईल. त्यांची एअरफोर्स, आर्मी थोडे दिवस टिकाव धरतील. पण लॉन्ग वॉरमध्ये पाकिस्तान टिकू शकत नाही. कारण पाकिस्तानकडे शस्त्रांचे तितके स्त्रोत, पैसा नाहीय” असं तिथल्या एक्सपर्टच म्हणणं आहे. तीन महिने युद्ध झाल्यास पाकिस्तान टिकू शकणार नाही. भारताविरुद्ध कुठल्याही युद्धात आपण टिकू शकत नाही, हे त्यांना माहित असल्यामुळेच पाकिस्तानने अणूबॉम्ब बनवला.
यावेळी प्रहार मूळावर
पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्यामागे पाकिस्तानच आहे हे सिद्ध झालय. आसिम मुनीरपासून शहबाज शरीफपर्यंत सर्वांना चांगलं ठाऊक आहे, भारत यावेळी सोडणार नाही. यावेळी प्रहार फक्त दहशतवादी तळांवर नाही, त्याच्या मूळावर होणार. पाकिस्तानकडे स्वत:ला वाचवण्याचा काही मार्ग नाहीय. त्यामुळे आसिम मुनीरची भित्री सेना आणि शहबाज सरकारमधील घाबरलेले मंत्री सारखे-सारखे अणूबॉम्ब, अणूबॉम्बचा जप करतायत. ताजी धमकी पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी दिली आहे.
‘गौरी, शाहीन, गजनवी क्षेपणास्त्र आम्ही चौकात सजवण्यासाठी ठेवलेले नाहीत’
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी म्हणाले की, “जर आमचं पाणी बंद केलं, तर युद्धासाठी तयार व्हा. गौरी, शाहीन, गजनवी क्षेपणास्त्र आम्ही चौकात सजवण्यासाठी ठेवलेले नाहीत. आम्ही ही अस्त्र हिंदुस्तान विरुद्ध वापरण्यासाठी बनवली आहेत” “आमच्याकडे 130 अणूबॉम्ब आहेत. ते आम्ही फक्त मॉडल बनवण्यासाठी ठेवलेले नाहीत. पाकिस्तानच्या कुठल्या, कुठल्या भागात आम्ही हे बॉम्ब ठेवलेत, हे सुद्धा तुम्हाला माहित नाही” असं हनीफ अब्बासी म्हणाले. पाकिस्तानी नागरिकांना दिलासा देण्यासाठी हनीफ अब्बासी हे बोलत असतील तर ठिक आहे. पण युद्ध तुमच्याकडे कुठली शस्त्र आहेत, ते पाहून लढलं जात नाही. तुमचा उद्देश, दृष्टीकोन आणि साहस त्यासाठी लागतं. 2016 आणि 2019 मध्ये सुद्धा पाकिस्तानकडे अणूबॉम्ब होता. पण त्यावेळी सुद्धा सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक केला.
शक्ती असेल, तर आत्मविश्वास वाढतो, पण….
खरंतर तुमच्याकडे शक्ती असेल, तर आत्मविश्वास वाढतो. पण पाकिस्तानी नेते ज्या प्रकारे अणूबॉम्बचा प्रचार करतायत, त्यातून त्यांची भिती दिसून येते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सतत स्टेटमेंट सुरु आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक वक्तव्यातून भिती स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, “आमच्या सर्व सुरक्षा यंत्रणा आणि सैन्य सर्व हाय-अलर्टवर आहे. इथे चूक होण्याची शक्यता नाही. आम्ही आमच्या सुरक्षेची व्यवस्था करत आहोत”
‘युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत’
दहशतवादाच मूळच संपवण्याची पीएम मोदींनी शपथ घेतली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची भूमिका पाहून पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल मुनीर ते संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या घशाला कोरड पडली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला युद्धासाठी तयार राहण्याचे संकेत देत आहेत.
‘आम्ही 100 % तयार आहोत’
पाकिस्तानचे गृह मंत्री मोहसिन नकवी म्हणाले की, “आम्ही 100 % तयार आहोत. त्यांच्यापेक्षा आम्ही युद्धासाठी जास्त तयार आहोत. आम्ही युद्धखोर आहोत. त्यांनी कुठलं पाऊल उचललं तर एकचे दोन आणि दोनचे चार होणार. आमचे पीएम आणि आर्मी चीफ बोलले आहेत”
‘…तर ऐलान-ए-जंग होणार’
पाकिस्तानच्या मनात भारतीय सैन्याच्या आक्रमणाची भिती इतकी आहे की, शहबाज शरीफ यांनी तपासाचा ड्रामा सुरु केलाय. एकाबाजूला मुनीरच्या सैन्याचे जनरल आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवत आहेत. दुसऱ्याबाजूला सारखी अणूबॉम्बची धमकी देत आहेत. “आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही आमच्यावर हल्ला करु शकत नाही. तुम्ही तुमची रेड लाइन क्रॉस केली, जसं की सिंधु कराराच पाणी बंद केलं किंवा दिशा वळवण्याचा प्रयत्न केला, तर ऐलान-ए-जंग होणार. ऐलान-ए-जंग झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीनिशी हल्ला करु. आमच्याकडे अणूबॉम्ब आहे. गरज पडल्यास आम्ही सुरुवातच न्यूक्लियर शस्त्रपासून करु. तुमचं अस्तित्व मिटवू” पाकिस्तानचे रिटायर्ड जनरल तारिक रशीद यांनी ही धमकी दिली.
विषारी मौलाना कामाला लागले
पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांवर झालेला हल्ला ही पाकिस्तानची शेवटची चूक आहे. दहशतवादाचा हा कारखाना कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे. शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांना ही गोष्ट नीट माहित आहे. पाकिस्तानातील कट्टरपंथियांना भडकवण्यासाठी मौलाना फजलुर रहमान सारख्या विषारी मौलानांना कामाला जुंपण्यात आलं आहे.
पाकिस्तानची कोण-कोणती शहरं पूर्णपणे उद्धवस्त होतील?
युद्ध झाल्यास पाकिस्तानची कोण-कोणती शहरं पूर्णपणे उद्धवस्त होतील?. पाकिस्तानच किती मोठ नुकसान होईल? पाकिस्तानच्या नॅशनल मीडियावर अशा चर्चा सुरु आहेत. त्यांच्या मनात किती दहशत आहे, याचे हे पुरावे आहेत. भारताकडे असलेल्या अणवस्त्रांबद्दल आता पाकिस्तानात कसा प्रचार चालू आहे, ते जाणून घ्या.
अणूबॉम्बबद्दल पाकिस्तानी एक्सपर्टच हास्यास्पद वक्तव्य
“भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश न्यूक्लियर पावर आहेत. जे अणूबॉम्ब भारताकडे आहेत, ते जुने अणूबॉम्ब आहेत. पाकिस्तान एक मोठा देश आहे. भारताने पाकिस्तानच्या कुठल्या शहराला टार्गेट केलं, म्हणजे अणूबॉम्ब टाकला, तर त्याचा 50 टक्के परिणाम भारतावर होईल” असं पाकिस्तानी डिफेन्स एक्सपर्ट जावेद चौधरी म्हणाले.
जर्ब-ए-हैदरी नावाने युद्धाभ्यास
पाकिस्तान एअरफोर्सने जर्ब-ए-हैदरी नावाने युद्धाभ्यास सुरु केलाय. कराची आणि रावळपिंडी एअरबेसवरुन पाकिस्तानी फायटर जेट्सनी उड्डाण केलं. गडबडीत पाकिस्तानी सैन्य आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत आहे. युद्धाभ्यास करता-करता पाकिस्तानी सैन्याने LoC वर सीजफायर तोडलं. लीपा आणि नीलम वॅलीमध्ये पाकिस्तानकडून फायरिंग झाली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या कृतीला 10 पट जास्त ताकदीने प्रत्युत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मागच्या तीन दिवसात पाकिस्तानने तिसऱ्यांदा सीजफायरच उल्लंघन केलंय. प्रत्येकवेळी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळालं आहे.