AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या ‘घरात घुसून मारु’ या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवादावर बोलताना म्हटले होते की, जर आमच्या देशातील शांती भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्यांना त्यांच्या घरात घुसून मारु. राजनाथ सिंग यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा मिर्ची लागली आहे. पाहा यावर काय म्हणाला पाकिस्तान.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या 'घरात घुसून मारु' या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ
india vs pakistan (1)
| Updated on: Apr 06, 2024 | 6:36 PM
Share

India vs pakistan : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर आता पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘घरात घुसून मारु’ या वक्तव्यावर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. भारताला 2019 च्या घटनेची आठवण करून दिलीये.

शुक्रवारी एका मुलाखतीदरम्यान राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर बोलताना एक वक्तव्य केले होते. भारताची शांतता बिघडवणारे किंवा हानी करणारे दहशतवादीही पाकिस्तानात पळून गेले तर भारत शेजारील देशात घुसून त्यांना ठार करेल, असे ते म्हणाले होते. 2020 पासून आतापर्यंत भारताने पाकिस्तानमध्ये 20 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला होता.

काय म्हणाला पाकिस्तान?

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘पाकिस्तानात मनमानीपणे दहशतवादी असल्याचे घोषित केलेल्या नागरिकांना मारण्याची भारताची तयारी ही अपराधीपणाची स्पष्ट कबुली आहे.

पाकिस्तान कोणत्याही आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यास तयार आहे. 2019 मध्ये आम्ही भारताच्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर दिले. यातून भारताचे पोकळ दावे उघड होतात. पाकिस्तानने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, त्यांच्या दोन नागरिकांच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा सहभाग असल्याचे विश्वसनीय पुरावे आहेत. मात्र, भारताने पाकिस्तानचा आरोप खोटा आणि द्वेषपूर्ण प्रचार असल्याचे म्हटले होते.

2019 पासून भारत-पाकिस्तान संबंधात तणाव

2019 पासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत चालले आहेत. काश्मीरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात पाकिस्तानस्थित दहशतवादी सापडले होते. या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

भारताने या पुलवामा हल्ल्यानंतर पीओकेमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईक केला होता. भारताने बदला घेण्यासाठी अनेक दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्थ केले होते. भारताच्या स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच भडकला होता. पण तो काही करु शकत नव्हता. कारण हे दशतवादी पाकिस्तानातून आले होते हे तो सांगू शकत नव्हता. पाकिस्तानने कधीही त्यांच्या देशातून दहशतवादी हल्लाला स्वीकरलेले नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.