पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड मुश्ताक जरगरसह भारताने सोडले होते हे तीन धोकादायक दहशतवादी, जाणून घ्या ती घटना
Pahalgam Terror Attack: कंदहार विमान अपहरण केल्यानंतर 176 प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांना सोडण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली. भारत सरकारने प्रवाशांना सोडवण्यासाठी या तीन दहशतवाद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दहशतवाद्यांना सोडल्यावर 176 भारतीय प्रवाशी परत आले होते.

Pahalgam Terror Attack: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याचा धोका आहे. त्याला कारण दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये घडवलेला हल्ला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली. आता भारत दहशतवादी आणि दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार आहे. पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड म्हणून मुश्ताक अहमद याचे नाव समोर आले आहे. त्याला कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर भारताने सोडले होते. आता त्याच दहशतवाद्यासह इतर तिघांनी भारतात अनेक वेळा दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत.
काय आहे ते प्रकरण
भारतीय सुरक्षा दलाने मोठ्या प्रयत्नानंतर तीन धोकादायक दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांची नावे मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख आहे. हे तिन्ही दहशतवादी भारताच्या कारागृहात होते. या दहशतवाद्यांना भारताने अटक केल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अडचणीत आली होती. आयएसआयकडून या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांना सोडवण्यासाठी मोठा कट रचला. या दशतवाद्यांनी इंडियन एयरलायन्सचे विमान आयसी-814 चे हवेतच अपहरण केले. त्यानंतर हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहारमध्ये नेले. परंतु पायलटने इंधन कमी असल्याचे कारण दिल्यावर काही वेळ अमृतसरमध्ये विमान उतरवण्यात आले. त्यानंतर हे विमान पाकिस्तानात गेले. त्या ठिकाणावरुन कंदहार येथे विमान पोहचले.
कंदहार विमान अपहरण केल्यानंतर 176 प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांना सोडण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली. भारत सरकारने प्रवाशांना सोडवण्यासाठी या तीन दहशतवाद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दहशतवाद्यांना सोडल्यावर 176 भारतीय प्रवाशी परत आले होते.
भारताने सोडलेल्या या तीन दहशतवाद्यांमध्ये सर्वात मोठे नाव मसूद अझहर आहे. त्याची जैश-ए-मोहम्मद संघटना आहे. मुंबई हल्ला, पुलमावा हल्ल्यात त्याचे नाव आले. दुसरा दहशतवादी मुश्ताक जरगर आहे. त्याचे नाव पहलगाम हल्ल्यात आहे. तिसरा दहशतवादी उमर शेख होता. मुश्ताक जरगर काश्मीरमध्ये काम करणारा एक धोकादायक दहशतवादी होता. त्याने अनेक हल्ले घडवून आणले होते. तसेच अनेक हल्ल्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यानंतर त्याला 1992 मध्ये अटक करण्यात आली होती. जरगर खूपच धोकादायक दहशतवादी आहे. यामुळे त्याला पाकिस्तानने आश्रय दिला.
