AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider | सीमा हैदर आणि सचिन यांच्यात दुरावा! या कारणामुळे सोडलं सासऱ्याचं घर

पाकिस्तानात गेलेली अंजू आणि पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. मात्र या प्रेम प्रकरणात आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Seema Haider | सीमा हैदर आणि सचिन यांच्यात दुरावा! या कारणामुळे सोडलं सासऱ्याचं घर
सीमा हैदर आणि सचिन यांच्यात बिनसलं, झालं असं की घर सोडण्याचा घेतला निर्णय
| Updated on: Jul 27, 2023 | 5:38 PM
Share

मुंबई : पाकिस्तानात राहात असलेली सीमा हैदर चार मुलांसह आपल्या प्रेमासाठी भारतात आल्याची चर्चा आपण गेल्या काही दिवसांपासून वाचत आहोत. पण ती भारतात आलीच कशी असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ना विजा ना पासपोर्ट तरी भारताच्या हद्दीत शिरली यामुळे सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कोणीही भारतात कसंही घुसू शकतं आणि आरामात राहू शकतो असाच अर्थ आता काढला जात आहे. नेपाळ किंवा बांगलादेशमधून भारतात घुसखोरी करणं किती सोपं आहे आणि देशाच्या सुरक्षेला कसा धोका निर्माण होऊ शकतो यावरून काही तज्ज्ञ मंडळी अंदाज बांधत आहे. अशी चर्चा एकिकडे रंगली असताना सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या लव्हस्टोरीमध्ये ट्विस्ट आला आहे. सीमा आणि सचिन यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला कारणही तसंच समोर आलं आहे.

सीमा हैदर आणि सचिन यांच्यात नेमकं काय झालं?

सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहणारी सीमा हैदर आता त्याच्यापासून दूर गेल्याचं बोललं जात आहे. सीमा हैदरने प्रियकर सचिन मीणा याचं घर सोडलं आहे. सचिन घर सोडून ती गावातील दुसऱ्या घरात शिफ्ट झाली आहे. हे घरं सचिनच्या ओळखीच्या व्यक्तीचं असल्याचं बोललं जात आहे. सीमाने सचिनसह सासरे आणि कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

सीमा हैदरने दूर जाण्याचा निर्णय का घेतला?

सचिनच्या घरी मीडियाचा गेल्या काही दिवसांपासून गराडा पडला आहे. तसेच सचिनच्या घरी लोकं सीमासोबत फोट काढण्यासाठी येत होते. त्यामुळे सचिन आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास होत होता. दुसरीकडे, ती दूर गेल्याने लोकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. कारण सचिनच्या घरी गेल्यावर सीमा तिथे नसल्याचं कळत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

सीमा हैदर हिची एटीएसकडून चौकशी

पाकिस्तानातून सीमा हैदर भारतात आल्याची माहिती मिळताच तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. युपी एटीएसने तिची सखोल चौकशी केली मात्र त्यांच्या हाती तसं काही लागलं नाही. पण ती चार मुलांसह नेपाळ मार्ग भारतात आल्याची घटना काही साधी नाही हे देखील तितकंच खरं आहे. अनेकांनी तर आयएसआय एजंट असल्याची शक्यता वर्तवली आहे. एजंटंना दिलेली ट्रेनिंग पाहता ते काहीच सांगत नाही अशीही चर्चा रंगली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं