AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seem Haider | सीमा हैदरच अचानक पाकिस्तान प्रेम कसं जागं झालं? सचिनच्या गर्लफ्रेंडचे बदलले सूर

Seem Haider | अंजू प्रेम प्रकरणामुळे सीमा हैदरची मागच्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा थंडावली होती. पण आता पुन्हा सीमा हैदरची चर्चा सुरु झाली. सीमा हैदरचे सूर बदलू लागले आहेत.

Seem Haider | सीमा हैदरच अचानक पाकिस्तान प्रेम कसं जागं झालं? सचिनच्या गर्लफ्रेंडचे बदलले सूर
Seema haider-Sachin MeenaImage Credit source: social media
| Updated on: Jul 27, 2023 | 11:07 AM
Share

नवी दिल्ली : प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे अचानक सूर बदलू लागले आहेत. तिने सुरुवातीला पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तानात महिला सुरक्षित नाहीत, मी तिथे जाणार नाही असं सीमा हैदर म्हणाली होती. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि देशात सीमा हैदरची चर्चा आहे. आपल्या चार मुलांसह सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. सीमा हैदरला टेक्नोलॉजीच असलेलं ज्ञान आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊन ती हेर असल्याच बोललं जात होतं.

या संबंधात तिची यूपी ATS कडून चौकशी सुद्धा झाली. सध्या ती प्रियकर सचिन मीणासोबत नोएडा येथे वास्तव्याला आहे. सीमा हैदरने जी माहिती दिली होती, त्यात बरीच विसंगती आढळल्याने तिची पोलीस चौकशी झाली.

सीमाचे सूर का बदलले?

सध्या ती जामिनावर बाहेर आहे. अंजू प्रेम प्रकरणामुळे सीमा हैदरची मागच्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा थंडावली होती. पण आता पुन्हा सीमा हैदरची चर्चा सुरु झाली. सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवलं जाऊ शकतं. त्यामुळे तिचे सूर आता बदलू लागले आहेत. पाकिस्तानात महिलांची स्थिती चांगली आहे, असं ती बोलू लागली आहे.

सीमाने आधी काय म्हटलं होतं?

“पाकिस्तानच्या शहरात मुलींना स्वातंत्र्य आहे. त्या फिरु शकतात, फॅशनेबल कपडे परिधान करु शकतात. पण मी जिथून आलीय, तिथे आजही महिलांना वाईट वागणूक दिली जाते” असं सीमा हैदरने म्हटलय. आधी सीमाने म्हटलं होतं की, “संपूर्ण पाकिस्तानात महिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. महिला तिथे बंधनामध्ये असतात. या उलट भारतात महिलांना स्वातंत्र्य आहे. पुरुषांप्रमाणेच त्यांची वाटचाल सुरु आहे”

सीमाच्या मनात नेमकं काय आहे?

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, सीमाला आता असं वाटतय की, भविष्यात तिला पाकिस्तानात पाठवलं जाईल. म्हणून ती जाणूनबुजून पाकिस्तानातील लोकांबद्दल चांगलं बोलत आहे. सीमाला खरंतर भारतात रहायचय. कारण पाकिस्तानात गेल्यावर काय होईल, याची तिला कल्पना आहे. पण ती त्याचवेळी खूप विचारपूर्वक पाकिस्तानबद्दल टिप्पणी करतेय. सचिनच्या नातेवाईकांची चौकशी होणार?

सचिनने सीमासोबत लग्न केलं, त्याबद्दल सचिनच्या बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या आत्याला, तिच्या मुलांना आणि नातेवाईकांना कल्पना होती. सीमा सचिनच्या आत्याच्या मुलांच्या संपर्कात होती. सुरक्षा यंत्रणा आता सचिनच्या नातेवाईकांची चौकशी करु शकतात. ट्रॅव्हल एजंटला पैसे पाठवणे आणि नेपाळमधल्या वास्तव्यासंदर्भात चौकशी होऊ शकते.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं