Tahawwur Rana : तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येताच पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, आपले खरे रंग दाखवले
Tahawwur Rana : तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येताच पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. तहव्वूर राणाने आपल्याला भारताच्या ताब्यात सोपवलं जाऊ नये, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले.

अमेरिकेकडून तहव्वूर राणाच प्रत्यर्पण झाल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. राणाच्या चौकशीतून मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या कटासह पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कची बरीच माहिती समोर येऊ शकते. मूळातच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच कारस्थान पाकिस्तानात रचण्यात आलं. पाकिस्तानातून 10 दहशतवादी भारतात आले. अजमल कसाबच्या रुपाने भारताला पाकिस्तानचा या कटातील सहभागाचा एक जिवंत पुरावा सापडला होता. आता तहव्वूर राणामुळे सुद्धा पाकिस्तानची बरीच पोल-खोल होणं बाकी आहे. तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येताच पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. 64 वर्षीय तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडीयन नागरिक आहे.
तहव्वूर राणाने आपल्याला भारताच्या ताब्यात सोपवलं जाऊ नये, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याची प्रत्यर्पण विरोधातील याचिका फेटाळून लावत त्याचे मार्ग बंद केले. “तहव्वूर राणाच्या कॅनेडीयन नागरिकत्वाबद्दल आम्ही आमची बाजू स्पष्ट केली आहे. कागदपत्रांचा विचार करायचा झाल्यास त्याने मागच्या 20 वर्षात पाकिस्तानी कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला नाही. पुढे यावर आम्ही बोलू” असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
राणाने कुठला बिझनेस सुरु केलेला अमेरिकेत?
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI, लष्कर-ए-तयबा यांनी मिळून मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. यात डेविड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा या दोघांनी मुंबईत दहशतवादी हल्ला कुठे-कुठे करता येऊ शकतो, याची रेकी करुन माहिती पुरवली होती. या सगळ्यामागे पाकिस्तानचा हात आहे, पण आता सवयीप्रमाणे त्यांनी हात झटकले आहेत. तहव्वूर राणा कॅनडाला जाण्याधी पाकिस्तानी लष्करात वैद्यकीय अधिकारी होता. 1990 साली तो अमेरिकेला गेला. तिथे त्याने इमिग्रेशन सर्व्हीसचा बिझनेस सुरु केला. फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हीसेस. शिकागो आणि अन्य शहरांमध्ये त्याची ऑफिसेस होती. पुढे याच बिझनेसच्या आधारे हेडली आणि त्याने हेरगिरी सुरु केली.
हेडलीने राणाबद्दल काय सांगितलेलं?
हेडली 2016 साली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई कोर्टासमोर हजर झाला. त्यावेळी त्याने गुन्ह्यातील राणाच्या सहभागाची कबुली दिली. राणाच्या मी सतत संपर्कात होतो, पाळत ठेवण्याच्या कामासाठी ऑफिस सुरु करण्यासाठी मी त्याची परवानगी घेतली होती असं हेडलीने सांगितलं.