AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुमलाजीवी, शकुनी, चांडाळ चौकडी शब्दांवर संसदेत बंदी; असंसदीय शब्दांची यादी तयार; शेतकऱ्यांसाठी आंदोलनजीवी शब्द कोणी वापरला विरोधकांचा सवाल

सभापतींवर आक्षेप घेणाऱ्या काही वाक्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आपण आमचा वेळ वाया घालवत आहात, तुम्ही आमचा गळा दाबा, अध्यक्षांना कमकुवत बनविले जात आहे हे सभापती आपल्या सदस्यांचे रक्षण करु शकत नाहीत, अशा वाक्यांना सभागृहांच्या कामकाजातून वगळले जाणार आहे.

जुमलाजीवी, शकुनी, चांडाळ चौकडी शब्दांवर संसदेत बंदी; असंसदीय शब्दांची यादी तयार; शेतकऱ्यांसाठी आंदोलनजीवी शब्द कोणी वापरला विरोधकांचा सवाल
आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचाImage Credit source: social media
| Updated on: Jul 14, 2022 | 3:59 PM
Share

नवी दिल्ली:  पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat) संसदेच्या (Parliament) दोन्ही सभागृहात काही शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे त्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या शब्दांना आता खासदारांच्यावतीने बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील चर्चेदरम्यान आता सदस्य यापुढे जुमलाजीवी, बालुबुद्धी खासदार, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप यासारख्या शब्दांचा वापर करु शकणार नाहीत (censor words). हे शब्द असंसदीय ठरविण्यात आले असून त्यांचा वापर झाल्यास ती अमर्याद वागणूक ठरेल आणि असे सदस्य कामकाजात भाग घेऊ शकणार नाहीत.

लोकसभा सचिवालयाने आक्षपार्ह शब्दांची असंसदीय शब्द 2021 ही यादी तयार केली आहे. त्यातील शब्दांना असंसदीय अभिव्यक्ती या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वीच यादी तयार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच ही यादी तयार करण्यात आली असून, त्यात अशा शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधिमंडळांमध्ये 2021 मध्ये असंसदीय ठरविण्यात आले आहे.

या वाक्यांनाही सभागृहांच्या कामकाजातून वगळणार

सभापतींवर आक्षेप घेणाऱ्या काही वाक्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आपण आमचा वेळ वाया घालवत आहात, तुम्ही आमचा गळा दाबा, अध्यक्षांना कमकुवत बनविले जात आहे हे सभापती आपल्या सदस्यांचे रक्षण करु शकत नाहीत, अशा वाक्यांना सभागृहांच्या कामकाजातून वगळले जाणार आहे.

छत्तीसगड विधानसभेतही काही शब्द वगळले

असंसदीय अभिव्यक्तीमध्ये छत्तीसगड विधानसभेत कार्यवाहीतून वगळलेल्या काही शब्दांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बॉबकट हेअर, गारियाना, अंट-शंट, उल्टा चोर कोतवाल को डांटे हे शब्द त्यामध्ये आहेत. राजस्थान विधानसभेत असंसद ठरविण्यात आलेल्या तलवे चाटना, काव काव करणे, तडीपार, तुर्रम खां, झारखंड विधानसभेत वापरले गेलेले कई घाट का पानी पीना, ठेंगा असं हिंदी शब्द या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

अशी तळटीप लिहिली जाते

संसदेतील चर्चेदरम्यान खासदार अशा अनेक शब्दांचा वापर करतात, नंतर सभापती सदनाच्या कामकाजातून हे शब्द काढून टाकण्याचा आदेश देतात. नियम 381 प्रमाणे सभागृहाच्या कामकाजातून जो भाग काढला जातो, त्यावर चौकट करून अध्यक्षांच्या आदेशाबहहुकूम हा भाग वगळण्यात आला आहे अशी तळटीप लिहिली जाते.

इंग्रजी शब्दांचानाही असंसदीय

इंग्रजीतील आय वि कर्स यू, बिटन विथ शू, बिट्रेड, ब्लडशेड, चीटेड, शेडिंग क्रोकोडाईल टिअर्स, डाँकी, गून्स, माफिया, रबिश, स्नेक चार्मर, टाऊट, ट्रेटर, बिच, डॉक्टर या शब्दांचानाही असंसदीय ठरविण्यात आले आहे.

भ्रष्टाचाराला ‘मास्टरस्ट्रोक’ म्हटले पाहिजे

हे शब्द असंसदीय घोषित करण्यात आले आहेत. आता लोकसभा सचिवालयाच्या या मार्गदर्शक सूचनांवर विरोधकांची प्रतिक्रिया आली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी याप्रकरणी ट्विट करून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सरकारचा हेतू हा आहे की जेव्हा ते भ्रष्टाचार करते तेव्हा ते भ्रष्ट होऊ नये, भ्रष्टाचाराला ‘मास्टरस्ट्रोक’ म्हटले पाहिजे. ‘दोन कोटी नोकऱ्या’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट’ असे वाक्प्रचार फेकले तर त्यासाठी सरकारला ‘धन्यवाद’ म्हटले पाहिजे. जुमलाजीवी नव्हे. देशातील अन्नदात्यांसाठी संसदेत आंदोलनजीवी हा शब्द कोणी वापरला? होता असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.