दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंग हे धक्कादायक, मोदी, शहांनीच खुलासा करावा; राऊतांची मागणी

केंद्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. त्यांचीही हेरगिरी करण्यात आली. विशेष म्हणजे ते मंत्री नसताना ही हेरगिरी केली. नंतर त्यांना मंत्रिपदे दिली. ( sanjay raut)

दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंग हे धक्कादायक, मोदी, शहांनीच खुलासा करावा; राऊतांची मागणी
संजय राऊत, शिवसेना खासदार

नवी दिल्ली: केंद्रातील दोन केंद्रीय मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. त्यांचीही हेरगिरी करण्यात आली. विशेष म्हणजे ते मंत्री नसताना ही हेरगिरी केली. नंतर त्यांना मंत्रिपदे दिली. हे सर्वच धक्कादायक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (Shivsena slams government over alleged phone-tapping, seeks probe)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. दोन केंद्रीय मंत्र्यांवरही पाळत ठेवली. केंद्रातील नवे रेल्वे राज्यमंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही हेरगिरी केली गेली. हे धक्कादायक आहे. त्यांच्यावर का पाळत ठेवली? कशासाठी पाळत ठेवली माहीत नाही. वैष्णव आधी मंत्री नव्हते. ते आता मंत्री झाले. मग त्यांच्यावर का पाळत ठेवली होती. याचा खुलासा झाला पाहिजे. विशेष म्हणजे ते याच खात्याचे मंत्री आहेत. आधी पाळत ठेवली. आता त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. हे का केलं? हे देशाला समजलं पाहिजे. हा गंभीर मुद्दा आहे, असं राऊत म्हणाले.

हा जनतेशी धोका

पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे असं या देशातील नागरिकांना वाटतं. अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि इतर कोणी असतील त्या प्रत्येकावर पाळत ठेवली जात आहे. त्यांची हेरगिरी केली जात आहे. हे काल स्पष्ट झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

एजन्सींकडून फोन टॅप

फोन टॅपिंग हा राजयीक मुद्दा आहे. तो प्रायव्हसीचाही मुद्दा आहे. सरकार फोन टॅपिंग का आणि कशासाठी करत आहे हे मला कळत नाही. आम्ही महाराष्ट्रात सरकार बनवत असताना आमचेही फोन टॅप करण्यात आले. उद्धव ठाकरेंपासून माझेही फोन टॅप केले. नाना पटोले यांचेही फोन टॅप झाले. सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सर्वांचे फोन टॅप केले जात होते. आमचे फोन टॅप करण्यासाठी मोठमोठ्या एजन्सी कामाला लावल्या होत्या. तरीही आम्ही सरकार स्थापन केलं. बंगालमध्येही फोन टॅप केले. तरीही सरकार बनलं. आम्ही घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जेपीसीकडून चौकशी करा

संपूर्ण देश चिंतीत आहे. देशाला धक्का बसला आहे. या देशात कोणीच सुरक्षित नाही असं वाटतं. कोणी आमचा फोन ऐकतोय. कोणी आमचा पाठलाग करत आहे. कोणी आमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे हे संपूर्ण प्रकरण देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेशी संबधित आहे. आज दुसरं कुठलं सरकार असतं यूपीएचं सरकार असतं भाजप विरोधात असतं तर त्यांची काय भूमिका असती. त्यांनी संपूर्ण देशात हंगामा केला असता. देशात तांडव केलं असतं. आज ते आम्हाला ग्यान शिकवत आहेत, असा टोला लगावतानाच भाजपने या मुद्द्यावर सभागृहाचं काम चालू दिलं नसतं. जेपीसीची मागणी केली असती. आम्हीही जेपीसीच्या चौकशीची मागणी करत आहोत. परंतु, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देशाच्या समोर येऊन सत्य सांगावं. हे संपूर्ण प्रकरण इस्रायलच्या कंपनीशी संबंधित आहे. मोदींच्या कार्यकाळातच इस्रायलशी आपले चांगले संबंध झाले आहेत. पूर्वीही होते आज चांगले झाले आहे. पण हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं ते म्हणाले. (Shivsena slams government over alleged phone-tapping, seeks probe)

 

संबंधित बातम्या:

काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, अग्रलेखातून राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

Parliament Monsoon Session: राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी

देशात कोणीही सुरक्षित नाही, संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला

(Shivsena slams government over alleged phone-tapping, seeks probe)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI