तुम्हालाही चंद्रावर जमीन खरेदी करायचीय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी…

तुम्हालाही चंद्रावर जमीन खरेदी करायचीय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी...

चंद्रावर जमीन खरेदी करण्याबद्दल बरेच प्रश्न आहेत, लोकांना त्यांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत.

Harshada Bhirvandekar

|

Jan 18, 2021 | 4:59 PM

मुंबई : एखाद्याने चंद्रावर आपल्या पत्नीसाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी जमीन विकत घेतली, असे आपण माध्यमांद्वारे बर्‍याच वेळा ऐकले असेल. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतरही त्याने चंद्रावर जमीन विकत घेतल्याचे वृत्त समोर आले होते. यापूर्वीही चंद्रावर जमीन खरेदी करून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना भेट म्हणून भेट दिली होती. हे ऐकून, लोक चंद्रावर जमीन कशी खरेदी करतात?, असा प्रश्न आपल्याला देखील पडला असेलच! (People buying land on moon to gifting their loved once)

चंद्रावर जमीन खरेदी करण्याबद्दल बरेच प्रश्न आहेत, लोकांना त्यांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत. चला तर जाणून घेऊया लोक चंद्रावर जमीन कशी विकत घेतात आणि त्यासाठी किती खर्च येतो… तसेच, कायदेशीररित्या चंद्रावर जमीन चंद्रावर जमीन खरेदी-करता येते का?

जमीन कशी खरेदी करावी?

आपण वृत्तपत्रांमध्ये किंवा इंटरनेटवर देखील पाहिले असेल जे लोक चंद्रावर जमीन खरेदी केली, असा दावा करतात. तथापि, त्यांच्या वतीने हा दावा खरा आहे, कारण इंटरनेटवर अशा बर्‍याच वेबसाईट्स आहेत, ज्या चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा दावा करतात. या वेबसाईट आपल्याला चंद्रावर जमीन खरेदी करण्याची ऑफर देतात आणि आपण त्याची रक्कम देता तेव्हा आपल्याला कागदपत्र देखील मिळतात. होय, जर आपण या वेबसाईटवरून जमीन विकत घेत असाल, तर आपल्याला त्याची कागदापत्र, प्रमाणपत्र, रेजिस्ट्री आणि चंद्रावर जमीन खरेदीचा दाखला देखील मिळतो. आजकाल बरेच लोक अशा वेबसाईटची मदत घेऊन चंद्रावर जमीन खरेदी करत ​​आहेत.

आपल्यालाही चंद्रावर जमीन देखील खरेदी करायची असेल, तर आपण या वेबसाईट्सद्वारे ऑनलाईन पैसे देऊन जमीन खरेदी करू शकता. जमीन खरेदी केल्यावर आपल्याला पृथ्वीच्या नकाशावर त्याचे स्थान, रेखांश इत्यादींची माहिती देखील दिली जाते. तसेच या भागाच्या नावाची माहितीही दिली आहे. यात उपग्रहाद्वारे घेतलेले फोटोदेखील एकत्र दिले जातात. आपल्याला चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा संपूर्ण अनुभव येथे दिला जातो.

किती पैसे लागतात?

या वेबसाईट्स चंद्रावर जमीन वेगवेगळ्या प्रकारे विकण्याचा दावा करतात. बर्‍याच वेबसाईटवर एकरानुसार चंद्रावरची जमीन विकली जाते. जर आपण त्या किंमतीबद्दल चर्चा केली तर, ही किंमत डॉलरमध्ये आहे आणि आपल्याला भारतीय चलनाऐवजी डॉलरनुसार पैसे द्यावे लागतील.

बर्‍याच वेबसाईटवरील दर पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, या वेबसाईट्स प्रति एकर सुमारे 30 ते 40 डॉलर्सच्या भावाने जमिनीची कागदपत्रे देत आहेत. भारतीय चलनानुसार ही किंमत 2500च्या आसपास आहे. याचा अर्थ असा की आपण चंद्रावर एक एकर जमीन सुमारे 2500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता (People buying land on moon to gifting their loved once).

नियम काय म्हणतो?

परंतु, जर आपण कायद्याबद्दल बोललो, तर हे बेकायदेशीर आहे. वास्तविक, 104 देशांनी संयुक्तपणे बाह्य अवकाश करारावर स्वाक्षरी केली आहे, जो करार 1967मध्ये पूर्ण झाला. विशेष म्हणजे भारताचे नावही या देशांमध्ये समाविष्ट आहे. त्याच्या नियमांनुसार चंद्र कोणत्याही देशांत येत नाही आणि त्यावर कोणीही आपला हक्क सादर करू शकत नाही.

या करारानुसार अवकाशांतील कोणत्याही वस्तूंवर कोणाचाही अधिकार नाही. अशा स्थितीत तेथे कोणीही काही विकत घेऊ शकत नाही किंवा तेथे कोणीही काही विकू देखील शकत नाही. अशा वेळी चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा हा दावा खोटा आहे. मग या वेबसाईट्स नक्की विकतात तरी काय?, असा प्रश्न उभा राहतो.

केवळ मानसिक आनंद

वास्तविक, या वेबसाईट कोणतीही जमीन विकत नाही. या वेबसाईट केवळ प्रमाणपत्र देतात, ज्यास कायदेशीर मान्यता नाही. आपण तेथे जाऊन राहू शकता किंवा तेथे जाऊ शकता, असे कधीही होऊ शकणार नाही. यातून केवळ मानसिक आनंद आणि समाधान मिळते. ही वास्तविक जमीन खरेदी नाही. ही केवळ प्रमाणपत्रे आहेत.

भेटवस्तू म्हणून अधिक वापर

आजकाल भेटवस्तू म्हणून चंद्रावरची जमीन देण्याचा ट्रेंड आहे आणि लोक त्यांच्या खास लोकांसाठी चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत. अशा प्रकारे, बर्‍याच वेबसाईट्स चंद्राच्या नावावर पैसे घेऊन जमीन विकल्याचा दावा करतात आणि प्रमाणपत्रही देतात. ही केवळ एक भेटवस्तू आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, चंद्रावर जमीन खरेदी करणे म्हणजे एका कागदाच्या तुकड्यासाठी पुष्कळ पैसे देण्यासारखे आहे.

(People buying land on moon to gifting their loved once)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें