पाकिस्तानात पेट्रोल २६० रुपयांवर तरीही भारतापेक्षा स्वस्त, काय आहे गणित?

महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सरकारने आणखी महागाई निर्माण केली आहे. परंतु भारतापेक्षा स्वस्त आहे.

पाकिस्तानात पेट्रोल २६० रुपयांवर तरीही भारतापेक्षा स्वस्त, काय आहे गणित?
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 4:41 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती (Pakistan Economic Crisis) हालाखीची झाली आहे. महागाई (Inflation) प्रचंड वाढली आहे. परकीय चलनाचा साठा संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे पाकिस्तानला जीवनावश्यक वस्तूंचीही आयात करता येत नाही. जीवनावश्यक वस्तूंबरोबर पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले आहे. पेट्रोलची किंमत २५० रुपये आहे. त्यानंतर पाकिस्तानात भारताच्या तुलनेत अत्यंत स्वस्त इंधन विकले जात आहे.

सध्या पाकिस्तानात सर्वच गोष्टींचा दुष्काळ आहे. रुग्णांना आवश्यक औषधे मिळत नाही. देशाची तिजोरी रिकामी झाली आहे. महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सरकारने आणखी महागाई निर्माण केली आहे. रविवारी (२९ जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५ रुपयांनी वाढ करण्यात आली. यानंतर, पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price In Pakistan) २५० रुपये आणि डिझेलची किंमत २६० रुपये प्रति लिटर

भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल कसे

हे सुद्धा वाचा

एका अमेरिकन डॉलरची किंमत जवळपास २६० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचली आहे. तर भारताचा रुपया सोमवारी डॉलरच्या तुलनेत ८१.६४ रुपयांच्या पातळीवर उघडला. यानुसार एक भारतीय रुपया ३.१० पाकिस्तानी रुपयाच्या बरोबरीचा आहे. म्हणजेच पाकिस्तानमध्ये एका डॉलरमध्ये एक लिटरपेक्षा जास्त पेट्रोल येते. कारण तिथे पेट्रोलची किंमत २५० रुपये आहे, तर एक लिटर डिझेल एक डॉलरमध्ये मिळतो.भारतात डॉलरची किमत ८१ रुपये असताना पेट्रोल १०७ रुपयांना मिळत आहे. पाकिस्तानात त्या तुलनेत स्वस्त पेट्रोल आहे. भारतात डिझेल ९५ रुपये लिटर आहे. म्हणजे एक डॉलरपेक्षा जास्त. तर पाकिस्तानात डिझेल एका डॉलरमध्ये येते. म्हणजे २६० पाकिस्तानी रुपयांत मिळत आहे.

भारतात पेट्रोल महाग का

शेजारील देशाच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानमधील पेट्रोलच्या किमतीतील तफावत का आहे. भारतात पाकिस्तानच्या तुलनेत पेट्रोल सुमारे २० टक्के महाग आहे. मात्र, यामागचे एक कारण केंद्र आणि राज्यांकडून इंधनावर लावला जाणारा कर असू शकते. भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे गणित पाहिल्यास एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत ५७.१३ रुपये आहे. यावर वेगवेगळे कर लावल्यानंतर तो १०७ रुपयांपर्यंत जातो. डिझेलचे गणित तेच आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.