Pravin Netaru : प्रवीण नेतारू यांच्या हत्येचे पीएफआय कनेक्शन?, भाजप नेत्याचा दावा

कर्नाटकच्या (Karnataka) बेल्लारीमध्ये मंगळवारी भाजपाच्या (BJP) युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेतारू (Pravin Netaru) यांची हत्या झाली होती. आता या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

Pravin Netaru : प्रवीण नेतारू यांच्या हत्येचे पीएफआय कनेक्शन?, भाजप नेत्याचा दावा
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 2:51 PM

नव दिल्ली: कर्नाटकच्या (Karnataka) बेल्लारीमध्ये मंगळवारी भाजपाच्या (BJP) युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेतारू (Pravin Netaru) यांची हत्या झाली होती. आता या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. सोबतच काही संशयितांना चौकशीसाठी देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे या हत्या प्रकरणाचा संबंध हा एसडीपीआय आणि पीएफआयशी असू शकतो असं प्राथमिक अहवालातून समोर येत असल्याचे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. तर ही हत्या पूर्वनियोजीत असावी असा संशय कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की, प्रवीण नेतारू यांच्या हत्येचं कनेक्शन हे एसडीपीआय आणि पीएफआयशी असल्याची शक्यता आहे. प्राथमिक अहवाल आणि मीडियामधून मिळत असलेल्या माहितीतून हे उघड होत असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.तसेच संबंधित संघटनांना केरळमध्ये आश्रय मिळत असल्याचा आरोप देखील जोशी यांनी केला आहे.

केरळच्या सीमावर्ती भागात हत्या

प्रवीण नेतारू यांच्या हत्येबाबत बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे की, नेतारू यांची हत्या ही केरळच्या सीमावर्ती भागात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणात कर्नाटक पोलीस हे केरळ पोलिसांची मदत घेत आहेत. कर्नाटकाच्या डीजीपींनी याबाबत केरळच्या डीजीपींसोबत चर्चा केली आहे. बोम्मई यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. या प्रकरणातील आरोपींची गय केली जाणार नाही, दोषींना कडक शिक्षा होईल असंही बोम्मई यांनी म्हटलं होतं. तर प्रवीण नेतारू यांच्या हत्येचे प्लॅनिंग आधीच झाले असावे असा अंदाज मंगळूरू पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी केरळमध्ये पळून गेल्याचा संशय

कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये मंगळवारी भाजपाच्या युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेतारू यांची हत्या झाली, हत्येनंतर आरोपी केरळमध्ये पळू गेले असावेत असा अंदाज कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी वर्तवला आहे. या हत्येबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटके केली आहे.त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग होता, ही हत्या पूर्वनियोजीत होती का? याचा तपास सुरू असून, या प्रकरणात केरळ पोलीस कर्नाटक पोलिसांना सहकार्य करत आहेत.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.