…तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार नाहीत! शेतकऱ्यांनो तुम्ही ‘ही’ चूक करु नका

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये या योजनेचा हफ्ता दिला जातो. त्यानंतर, दुसरा हफ्ता हा क्रमांक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यावर जमा होतो तर 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता असते.

...तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार नाहीत! शेतकऱ्यांनो तुम्ही 'ही' चूक करु नका
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 8:19 AM

नवी दिल्लीः केंद्र सरकारने चालू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)  12 वा हप्ता (12th installment) सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या होत्या त्यांचे पैसे मात्र अडकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर ईकेवायसीही (EKYC) केली नसेल तरीही खात्यावर पैसे येणार नसल्याचेही बोलले जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. त्यामुळे देशातील अनेकांच्या खात्यावर चार महिन्यातून दोन हजार रुपये मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेतून 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याच शेतकऱ्यांना 12 व्या हफ्त्याची आशा लागून राहिली आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये या योजनेचा हफ्ता दिला जातो. त्यानंतर, दुसरा हफ्ता हा क्रमांक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यावर जमा होतो तर 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आता या सप्टेंबर महिन्यात तरी एक हफ्ता मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

योजनेच्या आरखड्यात दुरुस्त्या

ही योजना 2019 मध्ये सुरू झाली होती, तेव्हा या योजनेचा लाभ फक्त लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांनाच दिला जात होता. मात्र त्यानंतरच्या काळात या आराखड्यात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहे, आता देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

ई-केवायसीची अंतिम मुदत संपली

ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अद्याप ई-केवायसी केली गेली नाही तर मात्र यावेळचा पीएम किसान योजनेचा हफ्ता चुकणार आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ताही लवकरच खात्याव जमा होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पैसे ट्रान्सफर होऊ शकतात, असे मानले जाते.

…म्हणून पैसे मिळणार नाहीत

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या होत्या, त्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळताना अडचणी येणार आहेत. आधार कार्ड आणि बँक खात्यावर असलेल्या नावात जर चुका आढळल्या तरीही पैसे मिळताना अडचणी येण्याची शक्यता आहे. बँक खाते बरोबर नसले तरीही तुमचे पैसे गोठवले जाऊ शकतात. त्यायाशिवाय आयकर भरणारे किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करणारे नागरिकही या योजनेपासून वंचित राहणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.