AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय लोक तुमच्या पाठीशी होते, नामिबियाच्या संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. यानंतर पंतप्रधानांनी नामिबियाच्या संसदेत भाषण केले. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय लोक तुमच्या पाठीशी होते, नामिबियाच्या संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण
PM modi speech
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 09, 2025 | 10:01 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदींना नामिबियाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. नामिबियाच्या प्राचीन वाळवंटातील वनस्पती वेल्विट्सचिया मिराबिलिसच्या नावावरून या पुरस्काराचे नाव ठेवण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधानांनी नामिबियाच्या संसदेत भाषण केले. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

नामिबियाच्या संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सभागृहाला संबोधित करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. लोकशाहीच्या जननीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. 1.4 अब्ज जनतेच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत.’

पंतप्रधानांनी पुढे बोलताना नामिबियात पार पडलेल्या निवडणूक निकालांचा केला. ते म्हणाले की, ‘काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक ऐतिहासिक क्षण साजरा केला. नामिबियात पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. तुम्हाला याचा किती गर्व आणि आनंद झाला हे मी समजू शकतो, कारण भारतातही राष्ट्रपतीपदावर महिला विराजमान आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भारताच्या संविधानामुळे एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची राष्ट्रपती आहे. संविधानाच्या या शक्तीमुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीलाही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. कारण ज्यांच्याकडे काहीही नसते त्यांच्याकडे संविधानाची हमी असते.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘भारतातील लोक स्वातंत्र्यलढ्यात नामिबियाच्या पाठीशी अभिमानाने उभे होते. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नैऋत्य आफ्रिकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी नामिबियातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेचे नेतृत्व भारतीय लेफ्टनंट जनरल दिवाण प्रेम चंद करत होते. भारताला तुमच्यासोबत उभे राहिल्याचा अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापाराबाबत बोलताना म्हणाले की, ‘आम्हाला आनंद आहे की नामिबिया हा भारताच्या UPI-(युनिफाइड पेमेंट इंटरफेस) तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा पहिला देश आहे. आपला द्विपक्षीय व्यापार 800 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आता आगामी काळात त्यात नक्कीच जास्त भर पडणार आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान